मुलींनो सांभाळा, सोशल मीडियाचा अतिरेक टाळा पोलिसांद्वारे किशोरवयीन मुलींचे समुपदेशन

संदीप कांबळे,कामठी
कामठी प्रतिनिधी १ एप्रिल प्रतिनिधी- येथील प्रभाग 15 तील रमा नगर भागात नवी कामठी पोलिस स्टेशनच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी किशोरवयीन मुलींची बैठक घेऊन मुलींनो सांभाळा, सोशल मीडियाचा अतिरेक टाळा असे आवाहान केले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींना आणि महिलांना लक्ष केले जात असून फेसबुक,ट्विटर, इंस्टाग्राम, व्हाट्सअप आणि इतर समाज माध्यमांचे माध्यमातून विविध आमिषे दाखवून मुलींची फसवणुन करण्यात येत आहे, मुलींनी खोट्या भूलथापांना बळी पडून आई वडिलांचे स्वप्न भंग करू नये असे आवाहान नवीन कामठी पोलिस स्टेशनच्या हेड कॉन्स्टेबल दीप्ती मोरघडे यांनी केले यावेळी उपस्थित किशोरवयीन युवतींनी विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन केले.
फोनपे, गुगलपे आदी डिजिटल पेमेंट माध्यम वापरताना काळजी घ्यावी,कुणालाही ओटीपी शेअर करू नये, अनोळखी लिंक जॉईन करताना खात्री असल्यासच जॉईन करावी खोट्या भूलथापांना आणि आमिषांना बळी पडू नये असे आवाहान जुनी कामठी पोलिस स्टेशनच्या पोलिस नायक माया अमरू यांनी केले.
फेसबुक,व्हाट्सअप व इतर समाज माध्यमावर अनोळखी लोकांना फेसबुक वर फ्रेंड बनवणे, कोणाची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारावी आणि कोणाची नाही याचा सदविवेक बुद्धीने विचार करावा असे आवाहनही पोलिस अधिकाऱ्यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी नगरसेविका संध्या रायबोले, शिल्पा हुमने,अरविंद चवडे, मुकेश बाराहाते, परमानंद मेश्राम, अजाबराव डोंगरे यांनी सहकार्य केले.
याप्रसंगी शिवानी वक्कलकर,महिमा मानमुंढरे,तेजस्विनी चवडे, पल्लवी वक्कलकर, साक्षी यादव, निशा वक्कलकर,आरती सोनटक्के, निलिमा रामटेके सुषमा इनवाते ,शीला डोंगरे, सिमा गजभिये, मंगला कुकडे, प्रेमलता वक्कलकर, खुशी डोंगरे,मुस्कान ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

जिल्हा क्रीडा संकुल बांधकाम तातडीने पूर्ण करा- मंत्री सुनीलबाबू केदार

Fri Apr 1 , 2022
संदीप कांबळे,कामठी – 24 कोटी रूपयाचा मंजूर निधीतील जिल्हा क्रीडा संकुल बांधकाम अजूनही कासवगतीने कामठी ता प्र 1:- ग्रामीण भागातील खेळाडूंना विविध राष्ट्रीय मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी व कामठी तालुक्यातील उपेक्षित खेळाडूंची क्रीडा संकुलाची मागणी लक्षात घेत खेळाडूंच्या उज्वल भविष्याच्या चिंतेतून जिल्हा क्रीडा संकुलाची संकल्पना मनात हेरून जिल्हा क्रीडा संकुल व फुटबॉल ग्राउंड बांधकामासाठी शासनाने 29 मार्च 2016 ला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com