नागपूर :- महानगरपालिका द्वारे अत्याधुनिक सुविधा असलेले भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी ई-ग्रंथालयाचे निर्माण करण्यात आले असुन हे ग्रंथालय (अभ्यासिका) विद्यार्थ्यांकरीता सुरू करण्यात आले आहे. या ग्रंथालयात विद्यार्थ्यांसाठी संगणक इंटरनेट सुविधा तसेच विविध स्पर्धा परिक्षेसाठी पुस्तके उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी ई-ग्रंथालयात नेत्रहीन विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले असुन येथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या संगणक व ब्रेललिपीचे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यात आले आहे व हे ग्रंथालय त्यांच्या साठी निःशुल्क सुरू करण्यात आले आहे.
या ग्रंथालयाला मान्यवरांनी भेट देवून त्याच्या कडील विविध पुस्तके देणगी स्वरूपात दिलेली आहे. याअंतर्गत माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी साहित्याची पुस्तके, ब्रजभूषण शुक्ला यांनी चार्टर्ड अकाउंटंट अभ्यासक्रमाची पुस्तके, अजय गौर यांनी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची पुस्तके व संतोष मिश्रा यांनी हिंदी साहित्याची पुस्तके ग्रंथालयाला भेट दिलेली आहे.
जागतीक दर्जाची सर्व सोई-सुविधांनी युक्त अश्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी ई-ग्रंथालयाचा व अभ्सासिकेचा मोठया प्रमाणात विद्यार्थ्यांनी लाभ घेत असुन याव्यतिरिक्त आणखी विद्यार्थ्यांनी तसेच नेत्रहीन दिव्यांगांनी या ग्रंथालयाचा लाभ घेण्याचे म.न.पा. प्रशासनाद्वारे द्वारे आवाहन करण्यात येत आहे.