नागपूर :- भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त “संविधान जागर समिती महाराष्ट्र” यांच्या वतीने राज्यभरात “घर घर संविधान” हे अभियान राबविण्यात येणार आहे. दि.२६ ऑक्टोबर पासून तर २६ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत राबविणत येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता या संविधानिक मुल्यांचा जागर करण्यात येणार आहे. अभियानाच्या अंतर्गत राज्यभर विविध कार्यक्रम, उपक्रम, स्पर्धा आयोजित करणार आहोत. तसेच यानिमित्त घरोघरी संविधान सरनामा तसेच पुस्तिका वितरित करून संविधानिक मूल्यांचा प्रसार केला जाणार आहे. संविधानाच्या बद्दल काही लोक हेतुपुरस्सर खोटी माहिती व नॅरेटीव्ह पसरवत आहेत.
नागरिकांमधील गैरसमज दूर करून योग्य व वास्तव माहितीचे जागरण या अभियानाच्या द्वारे होईल. ‘संविधान जागर समिती’ मध्ये राज्यातील अनेक संस्था संघटना एकत्र आलेल्या आहेत व या द्वारे हे अभियान राबविले जाणार आहे. राज्य सरकारकडून नुकतीच या अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने नागरिकांनी १००% मतदान करण्याचे आवाहन देखील यानिमित्ताने करण्यात येणार आहे.
या अभियानाचा शुभारंभ खा. बृजलाल (माजी पोलीस महासंचालक उ. प्रदेश तथा माजी अध्यक्ष, अनुसुचित जाती व जमाती आयोग, उ.प्र.) यांच्या शुभहस्ते व दिलीप कांबळे (माजी मंत्री तथा अध्यक्ष, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ) यांच्या प्रमुख उपस्थितीत वाल्मिकी आश्रम, मिलिंदनगर, रिव्हर रोड, पिपरी संपन्न झालेला आहे.
या ‘घर घर संविधान’ अभियानात नागरिकांनी मोठया उत्साहात सहभागी व्हावे व प्रत्येक घरापर्यंत व घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत संविधानाचा जागर करावा, असे आवाहन संविधान जागर समितीयांच्या कडून करण्यात येत आहे.
संविधान जागर समिती महाराष्ट्र, नागपूर शाखा मनीष मेश्राम, डॉ. संदीप शिंदे, नेताजी गजभिये, अतुल बावने, आकाश मडावी, बाबू गवळी, सुरेश विंचूरकर, सचिन जांभूळकर, सुनील उईके, विनोद कोटांगळे राकेश भोयर, डॉ. निलेश लारोकार, अजय मेश्राम, राजु साळवे, रितीक बन्सोड, मुकूंद खळतकर, प्रमोद अगरवाल, रमेश पाटील, हेमलता जिभे, क्रोसिना साखरकर, राहुल पानट उपस्थित होते.