– २०० हून अधिक डॉक्टर्स ला सेवापुस्तिका वाटप
नागपूर :- भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी नागपूर महानगरद्वारे सोमवारी लोकमत चौक, रामदासपेठ परिसरातील गणमान्य डॉक्टरांना भेटून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवाकार्याच्या ९ वर्षपूर्तीनिमित्त केलेल्या विकास कामांसंबंधित घर चलो अभियान व सेवा समर्पण अभियानभाजपा नागपूरचे शहर अध्यक्ष आमदार प्रविण दटके यांच्या मार्गदर्शनात उत्साहात संपन्न झाले.
याअभियानासाठी शहर महामंत्री राम अंबुलकर, संघटन मंत्री विष्णू चांगदे,यांच्या नेत्तुत्वात अभियानाचा शुभारंभ झाला. यावेळी डॉ वरुण भार्गव, डॉ नंदू कोलवडकर,डॉ भालेराव, डॉ सुश्रृत बाभुळकर, डॉ उदय बोधनकर, डॉ किरीपकर, डॉ भुतदा, आदी २०० हून अधिक डॉक्टर्स ला भेटून मोदी ९ च्या सेवाकार्याची माहिती पत्रक देऊन अभियान विषयी माहिती देण्यात आली. या अभियानात नागपूर भाजप वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ गिरीश चरडे, महामंत्री डॉ श्रीरंग वराडपांडे, डॉ कोमल काशीकर, डॉ ज्ञानेश ढाकुलकर, डॉ माधुरी इंदूरकर, डॉ अजय सारंगपुरे, राकेश कोणतमवॉर,शिरीष जोशी, डॉ मुकुंद कुलकर्णी, डॉ गुप्ता, डॉ संजय लहाने, डॉ श्रद्धा प्रशांत, आशिष आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.