संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 27 – स्वास्थ्य संवर्धन हेतू शांतीकुंज हरिद्वार गायत्री परिवार तर्फे आयोजित 108 कुण्डीय गायत्री महायज्ञाचे आयोजन रामलक्ष्मी नगर, कामठी येथे दि. 20 मार्च ते 24 मार्चच्या दरम्यान करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी कन्हान, कामठी येथील विविध शाळेद्वारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले होते.
ह्यात बी. के. सी. पी. प्रायमरी तर्फे कृष्णजीवनावर आधारित नृत्यनाटिका व एक नृत्य सादर करण्यात आले. या नृत्यनाटिकेला ग्राम पंचायत, खैरीचे सरपंच बंडू कापसे यांनी नगद राशी देऊन पुरस्कृत केले.
बी. के. सी. पी. शाळेच्या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मराठी नाटक मोबाईलचा दुष्परिणाम तसेच पर्यावरण संरक्षणाचे महत्व हिंदी नाटिकेद्वारे प्रस्तुत केले.
शाळेच्या हायस्कूल व प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी शारीरिक शिक्षक अमित ठाकूर, सविता वानखेड़े व सनोज पानिकर यांच्या मार्गदर्शनाखाली योगाचे भव्य व उत्कृष्ट प्रदर्शन केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका कविता नाथ, जुलीयाना राव यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक वृंदा तोडकर, ममता कुथे, मनिषा डोणारकर, सुमन सिंह, पूनम धुसिया, सुनंदा पांडे, रेणू राऊत, नरोत्तम धवड यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात महत्वपूर्ण सहयोग दिला.सर्वत्र शाळेचे व विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
गायत्री महायज्ञ कार्यक्रमात बी. के. सी. पी. शाळा, कन्हानचे उत्कृष्ट प्रदर्शन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com