संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- वाईल्ड अनिमल एण्ड नेचर रेस्क्यु बहुद्देशी य संस्था कन्हान च्या चमुंनी बोरडा रोड कांद्री येथील मोनु कुंभलकर यांच्या शेता जवळ कुत्र्याने जख्मी केलेल्या हरिणाच्या पाळसाला रेस्क्यु करून सुरक्षित वन विभागाच्या टीटी सेंटर नागपुर च्या स्वाधिन करून त्या पाळसाला जिवनदान दिले.
बोरडा रोड कांद्री येथील मोनु कुंभलकर यांच्या शेता जवळ शनिवार (दि.९) डिसेंबर ला सायंकाळी ४ वाजता एका हरिणाच्या पाळसाला काही कुत्र्याने पकडुन गंभीर जख्मी केले होते. तेव्हा शेत मालकाने ही माहीती वाईल्ड अनिमल एण्ड नेचर रेस्क्यु बहुद्देशीय संस्था कन्हान च्या चमुंना दिली असता संस्था सदस्य मंगेश मानकर, अविनाश पास्पलवार, राम जामकर, विशाल इंगळे हयानी तात्काळ घटनास्थळी पोहचुन हरिणाच्या पाळसाला सुरक्षित रेस्क्यु करून वनविभागाच्या ट्रांजिस्ट ट्रीटमेंट सेंटर नागपुर च्या स्वाधिन करून त्या जख्मी हरिणाच्या पाळसाला जिवनदान दिले. संस्थेचे सदस्य २४ तास सेवेकरिता सक्रिय असल्याने आपल्या परिसरात कुठल्याही वन्य प्राणी अडचणीत, दुर्घटनाग्रस्त किंवा जख्मी अवस्थेत आढळल्यास वाईल्ड अनिमल एण्ड नेचर रेस्क्यु बहुद्देशीय संस्था कन्हान च्या सदस्याना वेळीच माहिती द्यावी. जेणे करून त्या प्राण्याला वेळीच सहाय्यता करून वन विभागाच्या स्वाधिन करून त्याचे प्राण वाचविता येईल. असे आवाहन संस्थेचे सक्रिय सदस्य राम जामकर हयानी केले आहे.