स्वच्छ भारत अभियान : बांधकाम साहित्य रस्त्यावर, १० हजार दंड

नागपूर :-  स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने री (ता.१८) ५ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ३० हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात १ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच ४ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल धंतोली झोन अंतर्गत बेलतरोडी रोड रामटेके नगर येथील अन्सारी प्लास्टिक या दुकानाविरुध्द कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच बेलतरोडी रोड, सोमलवाडा येथील हॉटेल रॉयल स्टे यांच्याविरुध्द विद्युत खांबांवर विनापरवानगी जाहिरात लावल्याबाबत कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे धरमपेठ झोन अंतर्गत रामदासपेठ नवप्रभा चेंबर येथील एलिट मेडिकल स्टोअर्स यांच्याविरुध्द रस्त्यालगत कचरा पसरविण्याबाबत कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत न्यू कॉलनी येथील वड्डेवार बिल्डर्स यांच्याविरुध्द बांधकाम साहित्य रस्त्यालगत टाकल्याबाबत कारवाई करून १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच राजनगर येथील भांगे अकादमी कोचिंग क्लासेस यांच्याविरुध्द विद्युत खांबांवर विनापरवानगी जाहिरात बॅनर लावल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

CAIT launched National Digital Nagrik Forum

Fri Apr 21 , 2023
Nagpur :-The Confederation of All India Traders (CAIT) today announced the creation of a National Digital Nagrik Forum, an online platform that aims to advance the rights of traders and consumers and other sections of the society and shape policy discourse around digital economy trade in India with a view to contribute to the Government of India’s vision of creating […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com