गांजा तस्करी करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात

नागपूर :- पोलीस ठाणे बोरी परीसरात स्थानीक गुन्हे शाखाचे पथक पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमीदाराने खात्रीशीर खबर दिली कि, वर्धा ते नागपूर मार्गावरील समृद्धी हायवे रोड जवळील जीत धाब्याजवळ दोन इसम येणार असून त्यांचे जवळील लगेज बैंग मध्ये अंमली पदार्थ गांजा भरून आहे व ते मुंबई येथे घेऊन जाणार आहे, प्राप्त खबरेची शहानिशा करणेकामी स्थागुशाचे पथकाने सापळा रचून मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन इसम रोड लगत त्याचे जवळ दोन लगेज सुटकेस घेवुन संशयितरित्या उभे असलेले दिसुन आले. आरोपी नामे-१) अगणु गोपाळ वर्मा, वय ४६ वर्ष, रा. शाहू नगर बेसा रोड माणेवाडा जि. नागपुर २) कुंदन शंकर इंगोले वय २९ रा धिवरपूरा घाट रोड, जुनी मंगळवारी नागपूर यांना ताब्यात घेऊन त्यांची व त्यांचे जवळील लगेज सुटकेसची झडती घेतली असता आरोपीतांकडुन १) २९ किलो २१९ ग्राम अंमली पदार्थ गांजा, कि. २,९२,१९०/- रू २) २ मोबाईल किंमती २५०००/- रु ३) २ लगेज बैंग कि ४०००/-रू. असा एकुण ३,२१,१९०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भा.पो.से) तसेच अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ साहेब यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस अधीक्षक दीपक अग्रवाल, नागपूर विभाग, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहा. पो.नि. किशोर शेरकी, सागर गोमाशे, पोउपनि बड्डू लाल पांडे, सफौ मिलींद नांदुरकर, पोहवा संजय बांते, मयूर देकले, आशिष भुरे, पोशी धोडतात्या देवकाते, रोहित आडे, चालक पोशी सुमित वांगडे, आशुतोष लांजेवार, वसंत राठोड यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जबरी संभोग करणाऱ्या आरोपीला कोर्टातुन शिक्षा

Sat Oct 26 , 2024
नागपूर :- पो.स्टे. सावनेर फिर्यादी यांच्या रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन सावनेर येथे अप क्र. ३२८/२१ कलम ३५४, ३५४(ड), ३७६ (२) (एन) भांदवि सहकलम ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १० पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. यातील आरोपी नामे- देशलाल संपत भलावी, वय २४ वर्ष रा. हॉटमेंट कॉलनी वाघोडा ता. सावनेर जि. नागपूर हा राहण्यास असून दि. २०/०६/२०२४ रोजी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!