– स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामिण ची कारवाई
बुट्टीबोरी :-पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार यांचे आदेशाने व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक ०१/०१/२०२४ रोजी नागपुर उपविभागात अवैध धंद्यांवर आळा घालणे संबंधाने पेट्रोलिंग करीत असताना पोलीस ठाणे बुट्टीबोरी हद्दीतून तेलंगणा कडून नागपूरकडे गाडी क्र. UP 84 F 8205 चारचाकी वाहनाने अंमली पदार्थ (गांजा) वाळगून वाहतूक करीत आहे. अशी खात्रीपूर्वक माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस स्टेशन बुट्टीबोरी परिसरात चंद्रपूर ते नागपूर रोड अमृतसर पंजाबी द्वाबा समोर रूईखैरी शिवार येथे नाकाबंदी दरम्यान गाडी क्र. UP 84 F8205 ची झडती घेतली असता वाहनात नाव आरोपी नामे- १) इकराम हुसैन इक्बाल हुसैन, वय २१ वर्ष, रा, फतेहगंज पुर्वी त. फरिदपूर जी बरेली (यु.पी) २) राजकुमार अशोककुमार सिवर, वय १९ वर्ष, रा. वॉर्ड नं. १ कलुबास डोगरगढ बिकानेर (राजस्थान) हे एका पांढऱ्या रंगाच्या बोरीमध्ये गुंगीकारक वनस्पती गांजा बाळगून वाहतूक करतांना मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन १) ८६ किलो ७२० ग्रॅम किंमती ८,६०,०००/-रू. २) गाडी क्र. UP 84 F 8205 किंमती १,५०,०००/-रू. ३) दोन मोबाईल संच किंमती २०,०००/- रू. असा एकूण १०,३०,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे बुट्टीबोरी येथे कलम २०, २२ एन. डी. पी. एस. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त मुद्धेमाल, दोन आरोपी व कागदपत्रे पुढील कायदेशीर प्रक्रिये करीता पोलीस ठाणे बुट्टीबोरी यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कार्यवाही ही मा, पोलीस अधीक्षक हर्ष पोहार (भा.पो.से), अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक आशीष मोरखडे, सहायक फौजदार महेश जातव, पोलीस हवालदार अरविंद भगत, गजेंद्र चौधरी, मिलिंद नांदुरकर, संजय वाते, मयूर ढेकळे, सत्यशील कोठारे, पोलीस नायक अमृत किनगे, पोलीस अंमलदार राकेश तालेवार चालक आशुतोष लांजेवार, सुमित वांगडे यांचे पथकाने पार पाडली.