संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 30 :- दहा दिवसीत गणेशउत्सवा दरम्यान नागरिकांनी शासनाचे नियम पाळून शहरात कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे तसेच गणेशोत्सव मंडळानी अनधिकृत विजेचा वापर केल्यावर घडलेल्या अनुचित घटनेतून जीवितहानी झाल्यास दोषी गणेश मंडळावर भादवी कलम 304 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात येईल असे प्रतिपादन नवीन कामठीचे ठाणेदार संतोष वैरागडे यांनी नवीन कामठी पोलीस ठाण्यात आयोजित शांतता समितीच्या सभेत मार्गदर्शन करताना व्यक्त केले . यावेळी कामठी नगर परिषद चे मुख्य अधिकारी संदीप बोरकर ,नायब तहसीलदार अमर हांडा, विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता वैभव नासरे ,प्रशांत खोपडे प्रामुख्याने उपस्थित होते .
शांतता समितीच्या सभेत माजी नगरसेवक प्रतीक पडोळे ,लोकसेवक उज्वल रायबोले ,मोहम्मद आतिफ यांनी विविध सन व गणेश उत्सवा दरम्यान भारनियम होऊ नये ,शहरात मुख्य मार्गावर पडलेले खड्डे व स्वच्छतेची समस्या मांडली असता प्रशासनाच्या वतीने भार नियमन, स्वच्छता खड्डे नगर परिषदेच्या वतीने सोडविण्यात येणार असल्याचे सांगितले ठाणेदार संतोष वैरागडे सभेत मार्गदर्शन करताना गणेशोत्सवाच्या मंडळांनी शासनाकडून परवानगी घेतल्याशिवाय गणपतीची स्थापना करू नये याकरिता शासनाच्या वतीने एक खिडकी योजना सुरू केली असून नगरपरिषद कार्यालयात कार्यालय सुरू करण्यात आले आहे परवानगी करिता विविध विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र लागतात त्यासाठी शासनाचे वतीने एक खिडकी योजना सुरू केली आहे त्याचा लाभ सर्व नागरिकांनी घेऊन, गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाचे विविध नियम पाळून गणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांनी केले व आभार प्रदर्शन गुप्त विभागाचे ठाकूर यांनी केले सभेला मोठ्या संख्येने गणमान्य नागरिक उपस्थित होते.