– स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीणची कारवाई
मौदा :- पोलीस स्टेशन मौदा जिल्हा नागपुर ग्रामीण येथे नागपुर जिल्हयातील पिडीत १५८ शेतकरी यांना नैसर्गीक आपत्तीमुळे शासनाकडून नुकसान भरपाई देण्याचे आमीष देवून त्यांचेकडुन विश्वासाने संबंधीत कागदपत्र घेवुन शेतकरी यांचे नावे करोडो रूपयाचे बोगस कर्ज प्रकरणे तयार करून ते बँक रेकॉर्डवर खरे असल्याचे दाखवून १९३. ४६. ९९.००३ / रूपयाचा अपहार करून फसवणुक केल्याचे फिर्यादीचे रीपोर्ट वरून पोलीस स्टेशन मौदा येथे गुन्हे रजि नं. ७८३ / २०२३ कलम ४०६, ४०९ ४१३ ४२०, ४६५ ४६७, ४६८, ४७९ १२० (ब) भादवि सहकलम ३ एम. पी. आय. डी. सहकलम ६६ (बी) आय.टी. अॅक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोदार (भा.पो.से) यांनी सदर गुन्हयातील मुख्य आरोपी रमन्नाराव मुसल्या बोल्ला व विरव्यंकटराव सत्यनारायण वाकलपुडी यांचा शोध घेवून अटक करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण येथील विशेष पथक तयार केले. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दोन्ही आरोपींचा शोध सुरु करून तांत्रिक पद्धत तसेच गोपनिय बातमीदार यांच्याकडुन खात्रीशिर माहिती मिळाली की, आरोपी हे कर्नाटक राज्यातील बंगलोर व आंध्रप्रदेश राज्यातील विजयवाडा येथे असल्याची माहिती मिळाली. सदर माहितीवरून वरीष्ठांच्या परवानगीने सुरूवातीला बंगलोर येथे शोध घेवून तेथे मिळून न आल्याने त्यानंतर विजयवाडा आंध्रप्रदेश येथे जावुन शोध घेतला असता दोन्ही आरोपी विजयवाडा येथे एका हॉटेल मध्ये मिळुन आले. स्थानिक पोलीसांच्या मदतीने दोन्ही आरोपी नामे १) रमन्नाराव मुसल्या बोल्ला वय ४८ वर्ष रा. प्लॉट नं. ५९४ / २५० भारत नगर, कळमना, नागपूर आणि २) विरव्यंकटराव सत्यनारायण वाकलपुडी वय ४३ वर्ष रा. डुंबरी स्टेशन, चंपा आश्रम, पोस्ट खंडाळा तह. पारशिवनी जि. नागपूर यांना कायदेशिररित्या ताब्यात घेतले.. वरील दोन्ही आरोपीतांना पुढील कायदेशीर प्रक्रियेकरीता आर्थिक गुन्हे शाखे अंतर्गत विशेष तपास पथकाकडे दोन्ही आरोपीतांना ताब्यात देण्यात आले.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नागपूर (ग्रामीण) हर्ष पोद्दार (भा.पो.से.) तसेच अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, पोलीस उपनिरीक्षक बलाल पांडे, पोलीस हवालदार विनोद काळे, इक्वाल शेख, दिनेश आधापुरे, पोलीस नायक रोहन डाखोरे, सतीश राठोड यांनी पार पाडली.
सदर गुन्हयाचा तपास विशेष पथकाने प्रमुख उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक विभाग आशित कांबळे (भा.पो.से.), उपविभागीय पोलीस अधिकारी नागपूर विभाग पूजा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक किशोर नगराळे, सहायक फौजदार शांताराम मुदमाळी, पोलीस हवालदार प्रविण सिडाम, अजिज शेख, सचिन खरवडे, ललीत उईके, महिला पोलीस हवालदार स्वाती लोखंडे, विशाखा मुंडे, पोलीस नायक गजेंद्र निवेकर, पोलीस अमलदार वृशभ उईके, निलेश बरडे हे करीत आहे. सदर दोन्ही आरोपीतांना आज रोजी मा. न्यायालयात हजर करून १४ दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला.