– प्रतिक्रिया –
– भारतीय जनता पार्टीचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरचा गड कायम ठेवून तिसऱ्यांदा विजय मिळवला
नागपूर :- लोकसभा पंचवार्षिक निवडणूक ही गेल्या 1952 पासून चालत आलेली पंचवार्षिक योजना असून आज ही पंचवार्षिक योजना अठरावी यशस्वी झाली आहे. मंगळवार दि. 4 जून 2024 रोजी, नागपूर लोकसभा मतदार संघातून अधिकृत उमेदवार नागपूर शहरातील विकास पुरुष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकाळपासूनच नागपूरचा गड कायम ठेवून सतत पहिल्या फेरीपासून तर आखरीच्या फेरीपर्यंत आघाडीवर राहिले आणि आखरीपर्यंत आघाडीवरच राहून प्रचंड मतांनी विजय मिळवला. महाविकास आघाडीचे विरोधी पार्टीचे टक्कर देणारे उमेदवार विकास ठाकरे यांचे नाव समोर आलेच नाही परंतु विदर्भात महाविकास आघाडीचे वर्चस्व राहिले !
गडकरींनी भविष्यातील बेरोजगारांसाठी, युवकांसाठी व गरिबांसाठी चांगल्या योजना आणून नोकरी देऊन चांगलं काम करावे आणि आजच्या घडीला जो महागाईचा प्रश्न आहे त्यावर तोडगा काढावा व गोर – गरिबांना सुखाची चटणी भाकर मिळावी. यासाठी शुभचिंतक देवराव प्रधान यांच्याकडून नितीन गडकरी विजयी झाल्याबद्दल अभिनंदन आणि नागपूर शहराचा गड कायम स्वरूपी राखला असून भावी पंतप्रधान म्हणून मी त्यांच अभिनंदन करून पुढच्या वाटचालीसाठी व भविष्यातील चांगलं काम करावे यासाठी आभाळाभर शुभेच्छा
शुभचिंतक
देवरावजी प्रधान,नागपूर