महामहीम राष्ट्रपती यांच्या गडचिरोली दौ-यासाठी गडचिरोली पोलीस दल सज्ज

गडचिरोली :- दिनांक 05/07/2023 बुधवार रोजी गोंडवाना विद्यापीठात होणा-या दिक्षांत समारंभासाठी भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत.

महामहीम राष्ट्रपती यांच्या दौ-यादरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन गडचिरोली पोलीस दल सज्ज झाले असुन त्याकरीता तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. यामध्ये 151 अधिकारी, 639 पुरुष व महिला अंमलदार, 8 एस. आर. पी. एफ. चे प्लाटुन, 11 सि-60 चे पथके, वायरलेस, मोटार परिवहन विभाग व ईतर असे 1500 अधिकारी/अंमलदार तैनातीस आहेत.

महामहीम राष्ट्रपती व अतिमहत्वाच्या व्यक्तीसाठी वापरण्यात येणारा कोटगल टी- पॉईंट ते कोर्ट टी-पॉईंट हा मार्ग सामान्य नागरीकांना दिनांक 05/07/2023 चे पहाटे 05.00 वा. पासुन सायंकाळी 17.00 वाजेपर्यंत रहदारीसाठी बंद राहणार आहे. सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की आपण सदर मार्गाचा वापर न करता पर्यांयी मार्गाचा वापर करावा.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महामहीम राष्ट्रपती यांच्या गडचिरोली दौ-याच्या अनुषंगाने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागु

Tue Jul 4 , 2023
गडचिरोली :- मा. महामहीम राष्ट्रपती, भारत सरकार यांचा एक दिवसीय दौरा कार्यक्रम हा निश्चीत झाला असुन दिनांक 05/07/2023 रोजी मा. महामहीम राष्ट्रपती, भारत सरकार यांचे पोलीस स्टेशन गडचिरोली हद्दीत आगमन होणार आहे. दिनांक 05/07/2023 रोजी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील दिक्षांत समारंभ मध्ये मा. महामहीम राष्ट्रपती, भारत सरकार या उपस्थित राहणार आहेत. मा. महामहीम राष्ट्रपती, भारत सरकार यांना दहशतवादी संघटनाकडुन संभाव्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com