नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी ५ मे रोजी गांधीगेट महाल येथे ‘पौर्णिमा दिवस’ साजरा करण्यात आला. माजी आमदार प्रा. अनिल सोले यांच्या संकल्पेतून साकारलेल्या या अभियानामध्ये आमदार प्रवीण दटके यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शविली. यावेळी माजी आमदार प्रा. अनील सोले यांनी स्वतः जनजागृती केली.
ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर, बिष्णुदेव यादव, शीतल चौधरी, प्रिया यादव, तुषार देशमुख, पार्थ जुमडे, दीपक प्रसाद आदींनी परिसरातील नागरिक आणि दुकानदारांना एक तास विद्युत उपकरणे बंद करण्याचे आवाहन केले. अभियानाला परिसरातील नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी सर्वश्री भोलानाथ सहारे, अनिल झोडे, उपेंद्र वालदे, गिरधारी निमजे, तुलाराम मेश्राम, गुरूमीत सिंग, चेतना सातपुते, दिलीप रंगारी यांची उपस्थिती होती.
नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या वतीने दर महिन्यातील पौर्णिमेला पोर्णिमा दिवस साजरा करण्यात येत असतो.