– मुख्याध्यापकांशी संवाद साधत दिली विविध फेलोशिपची माहिती
नागपूर :- शिक्षण क्षेत्र कार्य करणाऱ्या ‘फुलब्राईट NGO’च्या प्रतिनिधीं शुक्रवारी (ता.६) रोजी नागपूर शहरातील वेगवेगळया NGO मार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेण्यास्तव नागपूर महानगर पालिकेच्या शाळांना भेट दिली.
फुलब्राईट NGO’च्या प्रतिनिधीं भेटीदरम्यान नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील काही उपक्रमांची माहिती जाणून घेतली याप्रसंगी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, युनाईटेड स्टेट्स इंडिया एज्युकेशनल फाऊंडेशनचे सिनियर प्रोग्राम ऑफीसर डॉ. सुदर्शन दास, प्रोग्राम मॅनेजर गायत्री सिंगल, पी.एच.डी., रिजनल ऑफीसर रेआन पेरेईरा, मनपाचे सहाय्यक आयुक्त गणेश राठोड, मनपाचे शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर,यांच्यासह इतर अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
फुलब्राईट NGO’च्या प्रतिनिधींनी मनपा शिक्षण विभाग व आकांक्षा फाऊंडेशन यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या बाभुळबन इंग्रजी प्राथमिक शाळेला भेट दिली. यामध्ये उपरोक्त पाहुण्यांनी या शाळेतील विद्याथ्र्यांशी व शिक्षकांशी संवाद साधला. तसेच या शाळेतील दर्जेदार शिक्षणामुळे परिसरातील गरीब व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळेतील शिक्षणाप्रमाणे मोफत व दर्जेदार शिक्षण देण्याची संधी प्राप्त झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच असे दर्जेदार शिक्षण मनपाच्या इतर शाळेमध्ये देण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील. असे आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.
सोबतच फुलब्राईट संस्थेतर्फे मोफत राबविण्यात येणाऱ्या विविध फेलोशीप बाबत माहिती देण्यासाठी मनपाच्या स्थायी समिती सभागृहामध्ये संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मनपातील विविध होतकरू शिक्षक, मुख्याध्यापक, नागपूर शहरातील खाजगी शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक तसेच आकांक्षा फाऊंडेशन शाळेतील शिक्षक यांना आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने फुलब्राईट NGOच्या प्रतिनिधींनी या संस्थेतर्फे चालविण्यात येणाऱ्या FDAI तसेच FTEA या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमामध्ये ६० देशातील शिक्षकांना मोफत फेलोशिप देवून त्यांना विशेष प्रशिक्षण दिल्या जाते. या प्रोग्राम मध्ये जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभागी व्हावे. असे आवाहन फुलब्राईट NGO संस्थेतर्फे करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजनाकरिता सहा. शिक्षणाधिकारी, उपासे, सुके, दिघोरे, विनय बगले, समन्वयक, सर्व शाळा निरीक्षक यांनी सहकार्य केले. आभार प्रदर्शन प्रशांत टेंभुर्णे शाळा निरीक्षक यांनी सहकार्य केले.