संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 3 ;- मागील काही वर्षांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी अपमानजनक शव्दाचा वापर कांग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर व राहुल गांधी करीत आहेत.त्यांचा अपमान सहन होत नसल्याने लोकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी त्यांच्या देशभक्तीची माहिती देण्यासाठी भाजप कामठी च्या वतीने 5 एप्रिल ला स्वातंत्र्य वीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आमदार टेकचंद सावरकर यांनी आज 3 एप्रिलला भाजप जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत दिली.
स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊम अंदमान मध्ये स्वातंत्र्य वीर सावरकर जेल मध्ये गेले त्यांना शारीरिक व मानसिक चालना सहन कराव्या लागल्या.त्यांनी देशाप्रती जागृती निर्माण करून देशासाठी जिव्हाळा निर्माण केला.परंतु त्यांचाच हेतुपुरस्पर वारंवार अपमान केला जात आहे.कधी दिल्लीत तर कधी केरळ मध्ये वेगवेगळ्या सभेतुन सावरकरांचा अपमान होत आहे.त्यामुळे भाजप सह शिवसेना शिंदेगट मिळुन 5 एप्रिल ला गौरव यात्रे दरम्यान पदयात्रा काढणार आहेत.कामठी तुन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.ही पदयात्रा रॅली पाच एप्रिल ला सायंकाळी पाच वाजता शुभारंभ करण्यात येणार असून शहरातील मार्गे भ्रमण करीत दुर्गा चौक येथे समापन करीत जाहीर सभा होणार आहे.या सभेत भाजप तसेच शिवसेना शिंदे गटाचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित राहतील.
आमदार टेकचंद सावरकर यांच्या नेतृत्वात ही सावरकर गौरव यात्रेचा प्रारंभ होणार आहे.या यात्रेत स्वातंत्र्य वीर सावरकर यांची रथयात्रा काढण्यात येणार आहे. .सर्व जाती धर्मातील नागरिक व विविध पक्षातील नेते ,पदाधिकारी,कार्यकर्ते सहभागी होणार आहेत..तरी सर्वांनीच या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन आमदार टेकचंद सावरकर यांनी केले .या पत्रकार परिषदेत ,शहराध्यक्ष संजय कनोजिया ,उज्वल रायबोले,चेतन खडसे,लाला खंडेलवाल,कपिल गायधने,प्रतीक पडोळे,चंद्रकांत सीरिया,विनोद संगेवार आदी उपस्थित होते.