नागपूर :- सुख-शांती-समाधान संस्थेचे च्यावतीने दि.१९ मे ते २६ मे या दरम्यान, योगा शिबिराचे आयोजन केलेले आहे. झिंगाबाई टाकळी बंधूनगर हनुमान मंदिर येथील सकाळी ५:४५ ते ६:४५ या वेळेत शिबिरात आसन, प्राणायाम, ओंकार तसेच वेग वेगळ्या आजरानुसार आसन, प्रात्यक्षिकासह, शिकविल्या जातात. या शिवाय व्यक्तिमत्त्व विकास कसा साधायचा सुप्त गुणांना जागृत करून त्याचे प्रगटीकरण कसे करायचे यावर सुद्धा मार्गदर्शन केल्या जाईल. प्रत्येक शिबिरातील व्यक्ती समाधानी होऊन संस्थेशी जुळून राहातो. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष योगगुरू श्री सचिनजी माथुरकर यांच्या मार्गदर्शनात मधुर वाणीने हे शिबिर संपन्न होणार आहे. तरी सर्व योगा प्रेमींनी या संधीचा लाभ घ्यावा. आणि आपले जीवन निरोगी निरामय आनंदमय करावे. असे आवाहन केले आहे. हि संस्था मागील १९ वर्षांपासून निःशुल्क, निस्वार्थी आणि सेवाव्रती कार्य करीत आहे.
असे सचिव शीला केळापूरे यांनी सांगितले आहे.