निःशुल्क योग शिबिराचे आयोजन १७ जुलै पासून

नागपूर :- सुख शांती समाधान संस्थेच्या वतीने १७ जुलै ते ३१ जुलै पर्यंत रोज सकाळी ५:३० ते ६:३० या वेळेत योगा शिबिराचे आयोजन जुना नांदा तथागत बुद्ध विहार लोन खैरी रोड कोराडी येथे करण्यात आले आहे. या शिबिरात आसन, प्राणायाम, ओंकार तसेच वेग वेगळ्या आजरानुसार ही आसन प्रात्यक्षिकासह शिकविल्या जातात. या शिवाय व्यक्तिमत्त्व विकास कसा साधायचा सुप्त गुणांना जागृत करून त्याचे प्रगटीकरण कसे करायचे यावर सुद्धा मार्गदर्शन केल्या जाते. प्रत्येक शिबिरातील व्यक्ती ही समाधानी होऊन संस्थेशी जुळून राहातो. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष योगगुरू सचिन माथुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मधुर वाणीने हे शिबिर संपन्न होत आहे. तरी कृपया सर्व योगा प्रेमींनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आपले जीवन निरोगी, निरामय, आनंदमय, सुखमय करावे. हि संस्था मागील १९ वर्षा पासून कार्य करीत आहेत. निःशुल्क, निस्वार्थी, सेवाव्रती होऊन करीत आहे. असे संस्थेच्या सचिव शिला केळापूरे यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला निषेध

Mon Jul 15 , 2024
नवी दिल्‍ली :- अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे. ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधात पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 ‘माझे मित्र आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मी चिंतेत आहे. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. राजकारणात आणि लोकशाहीत हिंसेला कोणतेही स्थान नाही. ट्रम्प यांना लवकर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com