– ३१ मार्च अर्ज करण्याची अंतिम मुदत
नागपूर :- ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था’, (सारथी) पुणे यांच्यातर्फे पुणे व सातारा येथील प्रशिक्षण संस्थांमध्ये कुणबी-मराठा या लक्षित गटातील युवक-युवतींकरिता मोफत मधमाशी पालन प्रशिक्षण देण्यात येणार असून अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२५ आहे.
या उपक्रमांतर्गत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या लक्षित गटातील शेतकरी, युवक-युवतींना सारथीच्या खर्चाने केंद्रीय मधमाशी संशोधन, प्रशिक्षण संस्था, शिवाजी नगर पुणे आणि मध संचालनालय, महाबळेश्वर सातारा या प्रशिक्षण संस्थांमार्फत मोफत मधमाशी पालन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सदर उपक्रमांतर्गत पात्र उमेदवारांना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता अर्ज करण्यासाठी ३१ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६.१५ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
या उपक्रमासंदर्भात विस्तृत माहिती सारथीच्या http://sarthi-maharashtragov.in
या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहिती केंद्रीय मधमाशी संशोधन संस्थेच्या www.kvic.org.in आणि www.mskvib.org या संकेतस्थळावर उपलब्ध असून या संधीचा फायदा घेत लक्षित गटातील जास्तीत-जास्त युवक-युवतींना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन, नागपूर सारथीचे उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी केले आहे.