संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- दिव्यांग फाउंडेशन व नायर मित्र परिवार च्या वतीने आज गुरुवार ला (दिव्यांग) हरीश राधाकिशन साड़ीवाल कामठी यांना दैनंदिन कामात उपयोगी पडण्यासाठी व येण्या जाण्यास उपयोगी व्हावे यासाठी एक इलेक्ट्रॉनिक (स्वयचालित) सायकल छत्रपति श्री शिवाजी महाराज चौकात भेटस्वरूप देण्यात आली.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य व दिव्यांग फाउंडेशन अध्यक्ष प्रदीप(बाल्या)सपाटे, सचिव बॉबी महेंद्र,उपाध्यक्ष अजय ठाकुर, कोषाध्यक्ष अमोल नागपुरे,बाल्या सोरते,पवन वांढरे,विक्रम कुलरकर व सहयोगी विनोद नायर, सुशांत कश्यप,वसंता सातपुते, हेरिश ग्रेगोरी, विनोद सीरिया, कैलाश शर्मा आदी उपस्थित होते.