गुड्डू रहांगडाले यांच्या जनसंपर्क कार्यालयातून आयुष्यमान कार्डाचे वाटप सुरू
पाच लाख रुपये पर्यंतचे मोफत उपचार या आयुष्यमान कार्डाच्या माध्यमातून होतात
नागपुर :- राज्य शासनाची महात्मा फुले जन आरोग्य योजना व केंद्राची पंतप्रधान आयुष्यमान योजना. या योजनांचे लाभार्थींना मोफत मध्ये पंजीकरण करून त्यांचे वितरण गुड्डू रहांगडाले यांच्या जनसंपर्क कार्यालयातून देण्यात येत आहे.
या कार्डच्या माध्यमातून नागपुरातील विविध रुग्णालयामध्ये पाच लाखापर्यंतचा उपचार त्यांची शस्त्रक्रिया मोफत मध्ये करण्यात येते. उदा. हृदयाचे आजार… एन्जोप्लास्टी, बायपास, कॅन्सरच्या शस्त्रक्रिया, स्पाईनचे आजार, किडनी स्टोन, लघवीचे आजार, फ्रॅक्चर व महात्मा फुले जन आरोग्य योजना येणारे सगळे आजार यांच्या शस्त्रक्रिया मोफत मध्ये होणार आहेत.
तरी भवानी नगर, पुनापुर, भांडेवाडी, पारडी, नविन नगर, श्याम नगर, अंबे नगर, क्षेत्रातील गरजू लाभार्थ्यांनी आपला आयुष्यमान कार्ड काढून घेण्यासाठी गुड्डू भाऊ राहंगडाले यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन मोफत मध्ये आपले कार्ड काढून घ्यावे आवश्यक माहिती करिता संपर्क : 8208122332, 7758957893