चारचाकी – दुचाकीमध्ये धडक, एकाचा मृत्यु तर एक जखमी

रामटेक :- रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रामटेक- तुमसर महामार्गावरील बोरी-शिरपूर शिवारात २ ऑगस्ट २०२३, बुधवारच्या सकाळी ११.०० वाजता रामटेक कडुन तुमसर कडे जाणाऱ्या टाटा-सुमो क्रमांक एम.एच.२९ व्ही ९८८४ आणि तुमसर कडुन रामटेक कडे येणाऱ्या मोटरसायकल क्रमांक एम.एच.४० बी.एन.४८८७ मध्ये आमोरासमोर धडक झाली. घटनेत दुचाकीवरील एकाचा मृत्यु तर दुसरा गंभीर जखमी झालेला आहे.

ही धडक इतकी जबरदस्त होती की मोटरसायकल चालक विलास धर्मेंद्र टेंभरे ,वय २६ वर्ष राहणार- देवटोला, गोंदिया याचा जागीच मृत्यू झाला तर मोटर सायकलवर मागे बसलेला सुमित मुलचंद हरीनखेडे वय-२५ वर्ष हा गंभीररित्या जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या सुमितला रामटेक उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले. त्यानंतर प्राथमिक उपचारानंतर मेडिकल कॉलेज नागपूर येथे हलविण्यात आले आहे. त्याची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. रामटेक पोलिसांनी घटनेची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घुग्घूस येथील भूस्खलनबाधितांच्या पुनर्वसनासाठी शासकीय भूखंड उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा, सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराला यश

Thu Aug 3 , 2023
मुंबई :- चंद्रपूर जिल्हयातील मौजा घुग्घुस गावात झालेल्या भुस्खलनामुळे बाधित 169 कुटुंबियांचे पुनर्वसनासाठी शासकीय भूखंड उपलब्ध करुन देण्याचा मार्ग आज मोकळा झाला आहे. चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान भवनात आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय आज झाला. भूस्खलनग्रस्तांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असल्याची ग्वाही या बैठकीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली, तर या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com