संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– कन्हान पोलीसांची अवैद्य रेती तस्करांविरूध्द धडक कारवाई.
कन्हान :- पोलीस स्टेशन हद्दीतुन अवैधरित्या विना परवाना शासनाचा महसुल बुडवुन रेतीची वाहतुक करणाऱ्या तीन १६ चाकी व एक १४ चाकी असे चार नॅशनल परमिट ट्रकना टेकाडी शिवारात नागपुर जबल पुर राष्ट्रीय महामार्गावर कन्हान पोलीसांनी पकडुन ३५ ब्रास रेती व ४ ट्रक असा एकुण १,१६,१०,०००/- रु चा मुद्देमाल जप्त करुन ४ ट्रक चालक व मालका विरूध्द भादंवि कलम ३७९, १०९, ३४ सहकलम ४८ (७)(८) महाराष्ट्र जमिन व महसुल अधिनियम १९६६ अन्वये कार्यवाही करण्यात आली
बुधवार (दि.४) ऑक्टोबंर २०२३ ला कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस पथक मा. पोलीस अधिक्षक हर्ष.ए. पोद्दार यांचे अवैध रेती वाहतुक थांबविण्याचे शुन्य सहनशीलता धोरण प्रमाणे संपुर्ण पो.स्टे .परिसरात कोणीही अवैध रेतीची वाहतुक करणार नाही. या हेतुने मिळालेल्या माहीती वरुन पोस्टे अंतर्गत मौजा टेकाडी शिवारातील नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्ग क्र. ४४ वर लक्ष्मी लॉज से सामोर दोन पंचासह नाकाबंदी केली असता ट्रक १)१६ चाकी नॅशनल परमिट ट्रक क्र. एमएच – ३२ ए जे – ५९३१ व त्यामधील ९ ब्रास रेती, २) १६ चाकी नॅशनल परमिट ट्रक क्र. एमएच – ३२ ए के – ५९३२ व त्यामधील ९ ब्रास रेती, ३) १६ चाकी नॅशनल परमिट ट्रक क्र. एम एच ३२ – ए के – १७८६ व त्यामधील ९ ब्रास रेती, ४) १४ चाकी नॅशनल परमिट ट्रक क्र. एमएच – ३२ क्यु – ५९३१ व त्यामधील ८ ब्रास रेती असे एकुण ३५ ब्रास रेती, ४ ट्रक सह एकुण १,१६,१०,०००/- रु चा मुद्दे माल जप्त करुन ताब्यात घेण्यात आला. त्याच प्रमाणे चारही ट्रक चालक १) शरद रामेश्वर सिराम वय ४१ वर्ष रा. सुकडी बाई ता. सेलु जि. वर्धा, २) शेख इरफान शेख बुरहान वय ४२ वर्ष रा. सालोड (हिरापुर) ता. जि.वर्धा, ३) राजेंद्र बाबुराव वांदिले वय ४१ वर्ष रा. माहुरे लेआऊट वार्ड नं. २ बस स्टॉप चे मागे सेलु जि. वर्धा, ४) अविनाश नत्थुजी मडावी वय ३१ वर्षे रा. खडकी तह सेलु जि. वर्धा यांचे तसेच ट्रक मालकांचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक हर्ष ए पोद्दार, अपर पोलीस अधिक्षक संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक भटकर यांचे मार्गदर्शनात वरिष्ट पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते, सपोनि चेतनसिंह चौहाण, सफौ गणेश पाल, सफौ सदाशिव काठे, पोहवा मुदस्सर जमाल, पोहवा हरीष सोनभद्रे , पोना अमोल नागरे, पोना महेंद्र जळितकर, पोना अनिल यादव, पोशि नविन पाटील, पोशि अश्विन गजभिये, होमगार्ड सैनिक हटवार आदीनी यशस्विरित्या पार पाडली. कन्हान पोलिसानी रेती तस्करांविरुद्ध केलेल्या धडक कारवाई करून मोठी अवैद्य रेती चोरी पकडुन शासनाच्या मालमत्तेचे रक्षण करून शासनाच्या महसुलात भर घातल्याने कन्हान थानेठार वरिष्ट पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते सह पोलीस कर्मचा-या चे कन्हान शहरातील बुध्दीजिवी नागरिका व्दारे अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.