संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कन्हान : – जयराज गायकवाड यांचा मुलगा आरूष याला शिव्या दिल्याने जुन्या वाद सुरू असलेल्या बाप लेकांनी मिळुन दोन सख्ख्या भावंडांवर धारदार चाकु तथा ब्लेडने हल्ला केला. यात मोठया भावाचा मृत्यू झाला तर दुसरा भाऊ युवराज गंभीर जखमी झाला आहे. ही घटना कन्हान पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सत्रापुर शिवारातील शीतला माता मंदिराजवळ गुरूवा र ला दुपारच्या सुमारास घडली. जयराज भीमराव गायकवाड (३२) असे मृतकाचे आणि युवराज भीम राव गायकवाड (३५) दोघेही रा. सत्रापूर असे जखमी भावाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार मृतक व जखमी सख्खे भाऊ असुन या भावांचा सत्रापूर गावातच शेजारी राह णारे आरोपी मेडंग पुरवले, देवेंद्र भेडंग पुरवले, साहिल भेडंग पुरवले या बापलेकांसोबत जुना बाद सुरू होता. अधूनमधून वादाची ठिणगी पडली की बाद उफाळून यायचा. गुरुवार (दि.२०) जुलै ला सकाळी ९ वाजता दरम्यान जख्मी युवराज भीमराव गायकवाड वय ३० वर्ष व मोठा भाऊ मृतक जयराज भीमराव गायकवाड वय ३२ वर्ष दोन्ही राहणार सत्रापुर कन्हान हे आपल्या घरी हजर असतांना युवराज यांचा पुतण्या आरुष हा घरी रडत रडत आला. मोठे भाऊ मृतक जयराज गाय कवाड यांनी आरुष का झाले ? असे विचारले असता आरुष ने सांगितले कि, “मला भेडंग पुरवले व त्याचे मुलांनी शिव्या दिल्या आहे.” यावरुन युवराज व मोठा भाऊ जयराज आरुष ला घेऊन घरा बाहेर निघाले तर भेडंग पुरवले, देवेन पुरवले, साहिल पुरवले व सतीश सोनबर्से हे घराजवळ आले व उलट “आरूष ने त्यांना शिव्या दिल्या आहे.” असे म्हणुन झगडा करु लागले. शेवटी वाद विकोपास जावुन भेडंग पुरवले याने पांढ ऱ्या रंगाचे ब्लेडने युवराज च्या पाठीवर उजव्या बाजुस वार करुन गंभीर जख्मी केले. युवराज चे रक्त पाहुण मोठे भाऊ जयराज याने भेडंग पुरवले व देवेन पुरवले यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता भेडंग पुरवले, साहिल पुरवले व सतीश सोनबर्से यांनी त्यास पकडुन ठेवुन हात बुक्क्याने मारपिट केली. तेवढ्यातच देवेन पुरवले याने त्याचे जवळील धारदार चाकु ने जयराज चे पोटावर सपासप वार करून जख्मी केले. घटनेनंतर कुटुंबीयांनी जयराज गायकवाड व युवराज गायकवाड यांना उपचार्थ कामठी येथील खाजगी राय दवाखान्या त दाखल केले असता उपचारा दरम्यान जयराज चा मृत्यु झाला. घटनेची माहिती कन्हान पोलिसांना मिळ ताच सहायक फौजदार गणेश पाल, मुदस्सर जमाल, सचिन वेळेकर यांनी इतर कर्मचाऱ्यांसह त्वरित राय दवाखाना गाठुन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊ न उत्तरिय तपासणीसाठी कामठी ग्रामिण उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.
जयराज चा मृत्यु नंतर काही वेळे करिता नाते वाईकां मध्ये तीव्र रोष निर्माण झाला होता. सदर घट ना गंभीर्याने घेत नागपुर ग्रामिण पोलीस अधिक्षक मा. विशाल आनंद यांनी घटनास्थळी भेट देऊन कन्हान पोलीसांना योग्य कार्यवाहीचे आदेश दिल्याने कन्हान पोलीसांनी आरोपी १) भेडंग पुरवले, २) साहिल भेडंग पुरवले, देवेन भेंडंग पुरवले, ४) सतीश सोनबर्से सर्व राहणार सत्रापुर यांना पकडुन जख्मी युवराज गायक वाड यांचा तक्रारी वरून चार ही आरोपी विरुद्ध कलम ३०२, ३०७, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस अधिक्षक विशाल आनंद यांचा मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक प्रमोद मकेश्वर, सहायक पोलीस निरिक्षक राजेश जोशी हे करीत आहे.