संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– शिबीरात शंभराहुन अधिक कामगारांनी केले रक्तदान.
कन्हान :- भारतीय कोळसा खदान मजदूर संघ उप क्षेत्र गोंडेगाव कोळसा खुली खदान व्दारे शंभराहुन अधिक कामगारानी रक्तदान करून भारतीय कोळसा खदान मजदुर संघाचा स्थापना दिवस थाटात साजरा करण्यात आला.
मंगळवार (दि.२३) जुलै ला भारतीय कोळसा खदान मजदुर संघाच्या ७० वा स्थापना दिवस भारती य कोळसा खदान मजदूर संघ उपक्षेत्र गोंडेगाव कोळ सा खुली खदान व्दारे रक्तदान शिबीराचे आयोजन करून शिबीराचे उद्धघाटन आर बी वर्मा उपक्षेत्र प्रबंधक, वेकोलि कोळसा खुली खदान गोंडेगाव यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरोनी पर्सनल मँनेजर कोळसा खुली खदान गोंडेगाव, जयंत आसोले, इलियास अहमद आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या वेळी डॉ हेडगेवार रक्त पेढी नागपुर चे डॉ हर्षा सोनी, किरण इंगळे, सुमित गायकवाड, गीता मेश्राम, प्रिया थुल, प्रियंका तायवाडे, पूजा भंडारकर, सुनिता सहारे, दिपाली, आलिशा, श्रीपाद मोहरील आदी चमुनी व्यव स्थित रक्त संकलन केले. शिबीरात शंभराहुन अधिक कामगारानी रक्तदान करून भारतीय कोळसा खदान मजदुर संघाचा ७० वा स्थापना दिवस थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता नीलम यादव, प्रकाश वायकर, जयप्रकाश चंद्रा, संजय रंगारी, संजय येलपुरे, चंदू घोटेकर, आशिष यादव, सुरेंद्र ठाकरे, संजय कात्यानी, शांतनु कात्यांनी, पितांबर ढेंगे, अजय वाळके सह भारतीय कोळसा खदान मजदूर संघाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यानी सहकार्य केले.