अमरदिप बडगे, प्रतिनिधी
महावितरणचे दुर्लक्ष
पाऊस येताच रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता कळेनासे
गोंदिया – शहरातील आंबेडकर चौकात महावितरणने अंडरग्राउंड लाईन दुरुस्तीच्या नावाखाली भर रस्त्याच्या कडेला खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे. मात्र दोन ते तीन दिवस लोटून खड्डा बुजविण्यात न आल्याने आणि खड्ड्याच्या बाजूला कोणतेही मार्क किंवा फलक लावण्यात आले नाही त्यामुळे या ठिकाणी पाणी येताच कुठे खड्डा आहे की रस्ता कळेनासे झाले आहे.
आज चक्क शाळेतील मुलं आपली सायकल घेऊनच या खड्ड्यात पडले आहेत. तर मुलांना शिक्षक बाहेर काढत आहेत कारण या ठिकाणीं विद्युत तार असल्याने त्या खड्ड्याच्या पाण्यातुन वाट काढावी लागत आहे. तर लवकरात लवकर खड्डा बुजविला नाही तर मोठी दुर्घटना किंवा जीव हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.