सावनेर : लॉयन्स क्लब २०२२-२३ करीता स्थापना आणिप दग्रहण समारोह मोठ्या थाटात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षपद ॲड. अभिषेक मुलमुले थांनी भुषविले. मुख्य अतिथी राजे मुधो भोसले, तर स्थापना अधिकारी डॉ. रिपल राणे, आर्वी, तर विशेष अतिथी म्हणून डॉ. विजय धोटे हे हजर होते.लायन्स क्लब सावनेर चे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. शिवम् पुण्यानी, सचिव प्रा. विलास डोईफोडे आणि कोषाध्यक्ष डॉ. प्रविण चव्हाण यांना पदग्रहण शपथ डॉ. रिपल राणे यांनी दिली.
मागील वर्षात घेण्यात आलेल्या विवीध आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि शेतीविषयक उपक्रमाचे अहवाल वाचन क्लब सचिव प्रा. विलास डोईफोडे यांनी केले . तर कोषाध्यक्ष अहवाल वाचन अँड. मनोजकुमार खंगारे यांनी केले. डॉ. विनोद जयस्वाल यांनी डॉ. भूषण शेंबेकर, सुशांत घंटे आणि मनोज पटेल यांना नवीन सदस्यांच्या स्वरुपात शपथ दिली.
गेल्या वर्षी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पदाधिकारी आणि सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले, आणि त्यांनी क्लबच्या उपक्रमांची मुक्तकंठाने प्रसंशा केली. समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्याची आणि पर्यावरणाची काळजी वाहण्याची आंतरराष्ट्रीय लायन्स कल्ब ची परंपरा भविष्यात कायम राहील असे मनोगत राजे मुधोजी भोसले यांनी व्यक्त केले. लायन्स क्लब करीत असलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांत समाजातील आर्थिकदृष्ट्या सशक्त घटकांनी हातभार लावावा असे प्रतिपादन डॉ. धोटे यांनी केले. संचालन चार्डर प्रेसीडेंट वत्सल बंगरे तर आभारप्रदर्शन किशोर सावल यांनी केले. प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते उपक्रमांच्या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. अध्यक्षपदाची सुत्रे डॉ. शिवम पुण्यानी यांनी ॲड. अभिषेक मुलमुले यांच्याकडून स्वीकारली. सदर स्थापना समारोहास विशेष आमंत्रीतांमधे जयंतराव मुलमुले, अतुल बंगरे, राजू पुण्यानी, योगेश पाटील, किशोर धुंदेले, विलास साखरे हजर होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता डॉ. परेश झोपे, मिथिलेश बालाखे, प्रविण टोणपे , डॉ. छत्रपती मानापुरे, हितेश पटेल, हितेश ठक्कर, रुकेश मुसळे, पियुष झिंजूवाडीया, ॲड. प्रियंका मुलमुले, मृणालीनी बांगरे, डॉ स्वाती पुण्यानी, प्रीति डोईफोडे, चित्रा झोपे, नेहा झिंजूवाडिया, कीर्ती टोणपे, रीमा बालाखे, सौ. खंगारे, सौ. ठक्कर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. राष्ट्रगीत गायनाने समारोहाची सांगता झाली.