कन्हान :- जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान संप्रदाय व्दारे समाज भवन हनुमान नगर कन्हान येथे आयो जित रक्तदान शिबीरात १०९ रक्तदात्यानी रक्तदान करून मौलिक कार्य केले.
रक्त फक्त दान, गरजुंसाठी ते मात्र जीवनदान ! म्हणुनच रक्तदान हेच सर्वश्रेष्ट दान !!
आपल्या महाराष्ट्रात सिकलसेल अनेमिया, हिमो फिलीया, बॅलॅसेमिआ, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर पेशंट जास्त आढळतात. अशा रुग्णांना वारंवार रक्ता ची नितांत आवश्यकता असते. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्तबाटल्या देण्याचे जगद्गुरू नरेंद्रा चार्य महाराज संस्थान संप्रदाया मार्फत निश्चित केले असल्याने जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान व्दारे महारक्तदान शिबीर दि.०४ जानेवारी ते. दि.१९ जाने वारी २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.
या महारक्तदान शिबीरांतर्गत समाज भवन हनुमान नग र कन्हान ता.पारशिवनी जि. नागपुर येथे सुध्दा रविवार (दि.१२) जानेवारी २०२५ ला सकाळी ८ ते ५ वाजे पर्यंत रक्तदान शिबीर घेण्यात आले. प्रथम माहुलीचे डॉ स्वाती वैद्य यांचे हस्ते व नगराध्यक्षा करूणा आष्टणकर यांच्या प्रमुख उपस्थित पुजन करून रक्तदान शिबिराची सुरूवात करण्यात आली.
एकुण १०९ रक्तदात्यानी रक्तदान करून मौलिक कार्य केले.आयुष ब्लड बँंक नागपुरचे डॉ. आयुषमान आनंद आणि त्यां च्या चमुनी रक्त संकलनाचे कार्य केले. रक्तदान शिबी राच्या यशस्विते करिता जगद्गुरू नरेंद्रा चार्य महाराज संस्थान संप्रादाय तालुका प्रमुख राजेंद्र नागपुरे, तालुका कमेटी शिबीर प्रमुख प्रेशित चकोले, युवा प्रमुख प्रथमेश राउत, कन्हान सतसंग प्रमुख निलेश शेळके, पारशिवनी लालुक्यातील सतसंग कमेटी यात खेडी, एंसबा, निलज, खंडाळा, कन्हान, बखारी, नांदगाव, एसंबा सह सर्व संतसंग कमेटी च्या भक्तानी सहभाग घेऊन सहकार्य केले.