माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तमेवार यांनी घेतला भायुमोच्या भ्याड कृत्याचा समाचार

नागपूर :- भाजपच्या स्वार्थाच्या राजकारणाला सामान्य माणूस कंटाळला आहे. इंडिया आघाडीतील उमेदवार विकास ठाकरे यांना शहरात मिळणारा प्रतिसाद बघून भाजपचे नेते चवताळले आहे. मी कालच्या सभेत उपस्थित केलेले महागाई, बेरोजदारी, भ्रष्टाचाराचे प्रश्न भाजपला झोंबले आहे. जनतेचा कौल बघून भाजपचे लोकसभा उमेदवार नितीन गडकरी स्वतः घाबरले आहेत. त्यामुळे त्यांनी भायुमोच्या कार्यकर्त्यांना माझ्या घराजवळ भ्याड कृत्य करण्यासाठी पाठवले. अशा शब्दात माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तमेवार यांनी त्यांच्या शंकरनगर येथील निवासस्थानाजवळ भायुमोच्या कार्यकर्त्यांच्या अवैध गोंधळाचा माध्यमांसमोर समाचार घेतला.

पुढे मुत्तमेवार म्हणाले, “नागपुरात प्रत्येक विधानसभा मतदार संघात काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा मिळत आहे. सर्व मतदार हे सुज्ञ असून त्यांनी भाजपचे आभासी विकास अनुभवले आहे. शहरातील जनतेने परिवर्तानाची हाक दिली आहे. त्यामुळे भाजप नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. म्हणून आचारसंहिता लागू असताना विना परवानगी मोठ्या संख्येत भाजपा युवा मोर्चाचा टोळका माझ्या घरा जवळ पूर्वनियोजितपणे गोळा झाला. त्यांनी माझ्या विरोधात अश्लिल घोषणा दिल्या. एक पुतळाही त्यांनी जाळला. यावरुन नितीन गडकरी किती घाबरले आहेत. हे दिसून येते.”

‘आमच्याकडेही हजारो कार्यकर्ते प्रत्येक मतदार संघात सक्रीय आहेत. त्यांना जर घटनेबद्दल कळालं असतं तर त्यांना इथे पोहोचण्यापासून कोणी अडवू शकत नव्हता. मात्र आम्हाला शहराचे वातावरण शांत हवे आहे. आम्हाला निवडणूका शांततेत पार पाडायच्या आहेत, म्हणून आम्ही कायद्याच्या मार्गाने चालत आहोत. आजची घटना ही खूप खालच्या पातळीची असून या अवैध कृत्याबाबत आम्ही तक्रार दाखल केली आहे. संबंधीतांवर गुन्हा दाखल होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.’

पोलिसांची बघ्याची भूमिका…

भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत माझ्या घराजवळ विना पोलिस परवानगी गोळा झाले. त्यांनी अश्लिल घोषणाबाजी केली. एक पुतळाही जाळला. हे सर्व सुरु असताना पोलिस बघ्याच्या भूमिकेत होते. कायदा सुव्यवस्था सांभाळणारे जर सत्ताधाऱ्यांपुढे नतमस्तक होत असतील तर याचा जाब विचारण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. याविरोधात आपण तक्रार दिली असून यावर कारवाई झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नसल्याचेही यावेळी मुत्तमेवार म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कांग्रेस के पास कार्यकर्ताओं को चाय पिलाने के लिए भी पैसे नहीं,थोथा ब्यान 

Sat Apr 6 , 2024
नागपुर :- कांग्रेस के पास चुनाव के दौरान अपने कार्यकर्ताओं को चाय पिलाने तक के पैसे नहीं हैं. हम रिश्तों में विश्वास करते हैं, ऐसा कांग्रेस के महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला ने कहा है. उन्होंने विश्वास जताया कि जनता हमारी मदद करेगी और जनता की मदद से हम लड़ेंगे और जीतेंगे. चेन्निथला के ब्यान का सभी मजाक उड़ा रहे हैं,सवाल यह […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com