माजी मंत्री सुनील केदार व सुरेश भोयर यांनी केला नुकसानग्रस्त भागाचा दौरा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-वारेगाव चा बंधारा फुटल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

कामठी :- खापरखेडा औष्णिक विद्दूत केंद्रातून निघणारी राख साठविण्यासाठी बांधण्यात आलेला कामठी तालुक्यातील वारेगाव बंधारा सततच्या पावसाने खचल्याने या बंधाऱ्यातील राख नदीच्या पाण्यातुन वारेगावच्या शेतात गेल्याने या राखमिश्रित पाण्यामुळे शेतातील उभ्या पिकाचे अतोनात नुकसान झाले.यामुळे या भागातील शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

ही बाब गांभीर्याने लक्षात घेत शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी खंबीरपणे राहणारे नेता माजी मंत्री सुनील केदार व माजी जी प अध्यक्ष व कामठी मौदा विधानसभा चे प्रमुख सुरेश भोयर यांनी आज सदर नुकसानग्रस्त भागाचा संयुक्त दौरा करीत खुद्द घटनास्थळी भेट देत महाजेनकोच्या मुख्य अभियंतासह नुकसानग्रस्त भागाचे निरीक्षण केले. याप्रसंगी अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्याचे आदेशीत केले.

याप्रसंगी महाजेनको चे मुख्य अभियंता विलास मोटघरे, सावनेर चे सभापती रवींद्र चिखले, कामठी पंचायत समितीच्या सभापती दिशा चनकापुरे,वारेगाव ग्रा प सरपंच कमलाकर बांगडे,उपसरपंच राजेश मेश्राम,कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कुणाल इटकेलवार,महाजेनको चे अभियंता गण व कार्यकर्ते उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राजेश कुमार शर्मा यांची महाराष्ट्र प्रदेश संयोजक प्रभारी पदी निवड

Sat Jul 22 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी येथील सामाजीक कार्यकर्ता तसेच उद्योगपती राजेश कुमार शर्मा यांची संयुक्त भारतीय धर्मसंसद च्या महाराष्ट्र प्रदेश संयोजकपदी नुकतीच निवड करण्यात आली. ही निवड संयुक्त भारतीय धर्मसंसद राष्ट्रीय संयोजक अरुण कुमार मालु यांनी केली. या पदावर निवड झाल्याबद्दल राजेश कुमार शर्मा यांनी राष्ट्रीय अध्यक्ष आचार्य राजेश्वर, राष्ट्रीय संयोजक अरुणकुमार मालु, स्वामी श्रीकरपात्री महाराज, भुवनचंद्र उनियाद, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com