– निलज गावकरी शेतक-यांना मिळणार लाभ.
कन्हान :- प्रत्येक कार्य सरकारी यंत्रणे मार्फत शक्य नाही. याकरिता गावातील लोकांच्या सहकार्याने निलज गावात लोकसहभागातुन वनराई बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली.” गाव करी ते राव न करी ” ही म्हण लक्षात घेत निलज गावात लोकसहभागातुन वनराई बंधारा उदयास आला. आता या बंधाऱ्यामुळे परिसरातील जलस्तर उंचाविणार आणि परिणामी शेतीला त्याचा लाभ होणार असल्याने गावकरी सुखावले.
गुरूवार (दि.२८) नोव्हेंबर ला गावातील नाल्या मधिल वाहुन जाणारे पाणी अडवुन पिकांना संरक्षित सिंचन करणे, जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणे , तसेच गावातील लोकांना दैनंदिन वापरासाठी पाणी उपलब्ध होण्याच्या सार्थ हेतुन कन्हान लगतच असले ल्या निलज गाव येथे लोकसहभागातुन वनराई बंधारा बांधण्यात आला. हा समाजोउपयोगी उपक्रम कृषी सहायक विवेकानंद शिंदे, धनराज चकोले, मनोज टोह णे, रविंद्र चकोले, रोमन चकोले, अजय वाघधरे, प्रफुल नागपुरे, राकेश पोटभरे, आकाश चकोले, रामचंद्र चको ले, ध्यानसिंग टेकाम सह शेतकरी बांधवाच्या सहकार्या ने वनराई बंधारा निर्माण करण्यात आल्याने निलज येथील ग्राम पंचायत सचिव विलास निवारे यांनी कृषी सहाय्यक व गावकरी शेतक-यांचे आभार व्यकत केले.