नागपूर :- पोलीस ठाणे बेलतरोडी हद्दीत ली-मेरीडियन हॉटेल जवळ, खापरी, नागपुर येथे किरायाने राहणारे फिर्यादी सुरेश मारोती आसकर, वय ५६ वर्षे हे लि-मेरीडियन हॉटेल जवळुन मोबाईलवर बोलत पायदळ जात असतांना, त्यांचे मागुन मोपेड गाडीवर दोन अज्ञात मुले येवुन फिर्यादीचे हातातील विवो कंपनीचा मोबाईल किंमती १५,०००/- रू. या जबरीने हिसकावुन पळुन गेले, याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे बेलतरोडी येथे आरोपोंविरूध्द कलम ३०९ (४), ३(५) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल केला होता.
नमुद गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस ठाणे बेलतरोडी येथील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी फिर्यादीने सांगीतलेल्या वर्णनावरून तसेच, तांत्रीक तपास करून व गुप्त बातमीदारा मार्फतीने मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून आरोपी क. १) अभिनव हर्ष रंगारी, वय २० वर्षे, रा. खरबी रोड, शेष नगर, नंदनवन, नागपुर २) सहजन वाईस खान, वय २० वर्षे, रा. चंद्रपूर यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्यांनी वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींना अधिक विचारपुस केली असता, त्यांनी बेलतरोडी हद्दीत ईतर एक जबरीचोरी करून एक मोबाईल हिसकावल्याचे सांगीतले. आरोपींचे ताब्यातुन विवो कंपनीचे ०२ मोबाईल फोन किंमती अंदाजे २५,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वरील कामगिरी रश्मीता राव, पोलीस उप आयुक्त, (परि. ०४) नागपुर शहर, विनायक कोते सहायक पोलीस आयुक्त (अजनी विभाग), नागपुर शहर यांचे मार्गदर्शनात, वपोनि. मुकुंद कवाडे, पोहवा. शैलेश बडोदेकर, जयंता शंभरकर व पोअं. हेमंत उईके यांनी केली.