मनपा प्रवर्तन विभागाद्वारे सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई

नागपूर :- नागपूर शहरातील फुटपाथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमणाविरोधात नागपूर महानगरपालिकेद्वारे सर्वत्र धडक कारवाई सुरू आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार संपूर्ण शहरातील कारवाईला गती देण्यात आली असून, सलग दुसऱ्या दिवशी देखील अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

मनपाचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांच्या नेतृत्वात नागपूर महानगरपालिकेच्या प्रवर्तन विभागामार्फत शहरातील विविध ठिकाणच्या अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई केली जात आहे. शुक्रवारी (ता: 2) हनुमान नगर झोन व गांधीबाग झोन परिसरातील अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात आली. याठिकाणीहून वस्तू जप्त करण्यात आल्या, अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांनी अतिक्रमण कारवाईची प्रत्यक्ष पाहणी केली, याप्रसंगी सहायक आयुक्त हरीश राऊत, प्रवर्तन अधिक्षक अधीक्षक संजय कांबळे, कनिष्ठ अभियंता भास्कर माळवे प्रामुख्याने उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिका प्रवर्तन विभागामार्फत माननीय आयुक्त त्यांच्या आदेशान्वये गांधीबाग झोन क्र ०६ अंतर्गत झोन कार्यालय ते तिलक पुतला चौक ते गांधी गेट चौक ते चिटणीसपुरा चौक ते बडकस चौक ते महाल चौक ते घाटे हॉटेल परिसर ते नंगा पुतळा चौक ते अग्रेशन चौक ते परत नंगा पुतळा चौक चौक ते शहीद चौक ते तीन नल चौक ते नंगा पुतळा चौक पर्यंत अतिक्रमणची कारवाई करण्यात आली. कारवाई मध्ये अंदाजे 03 ट्रक साहित्य जप्त करण्यात आले जप्त केलेले साहित्य झोन परिसर मध्ये अतिक्रमण पथकद्वारा जमा करण्यात आला. तसेच गांधीबाग झोन कार्यालय ते बडकस चौक ते अयाचित मंदिर ते लकडा पूल चौक पर्यंत अतिक्रमणची कारवाई करण्यात आली.

कारवाई मध्ये अंदाजे 03 ठेले जप्त करण्यात आले जप्त केलेले साहित्य झोन परिसर मध्ये अतिक्रमण पथकाद्वारा जमा करण्यात आला. तर झोन कार्यालय ते राम कुलर चौक ते अशोक चौक ते गडकरी वाडा परिसर ते गणेशपेठ पोलीस स्टेशन परिसर ते ते बडकस चौक ते चित्तर ओली चौक ते महाल चौक पर्यंत अतिक्रमण ची कारवाई करण्यात आली.कारवाई मध्ये अंदाजे 01 ट्रक साहित्य जप्त करण्यात आले जप्त केलेले साहित्य झोन परिसर मध्ये अतिक्रमण पथकाद्वारा जमा करण्यात आला.

याशिवाय हनुमान नगर झोन क्र ०३ आणि धंतोली झोन क्र ०४ अंतर्गत संयुक्तरित्या दोन्ही अतिक्रमण पथक झोन कार्यालय ते मेडिकल चौक ते क्रीडा चौक ते तुकडोजी पुतला चौक ते अजनी रोड ते वंजारी नगर पाणी टंकी परिसर पर्यंत अतिक्रमण ची कारवाई करण्यात आली ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले असे अंदाजे 05 ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महिलांसाठी मंगळागौर स्पर्धेच्या प्रशिक्षण शिबिर

Sat Aug 3 , 2024
– ४ ते ८ ऑगस्ट दरम्यान आयोजन,जागर श्रावणाचा, उत्सव नारीशक्तीचा  नागपुर :- मातृभूमी सेवा फाऊंडेशन मध्य नागपूर द्वारे आमदार प्रवीण दटके यांच्या संकल्पनेतून निर्मित वंदनीय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त महिलांसाठी भव्य मंगळागौर स्पर्धेचे आयोजन शनिवार १७ ऑगस्ट २०२४ रोजी आयोजित करण्यात आले असून या स्पर्धेत ११ उत्कुष्ट मंडळांना रोख पुरस्कार, श्रावण क्वीन, उत्कृष्ट निवेदक, असे अनेक पुरस्कार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com