मागील 40 वर्षांपासून कामठी चे कामगार कल्याण केंद्र कार्यालय अजूनही भाड्याच्या खोलीत..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी8

कामठी ता प्र 14 – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ हे महाराष्ट्र शासनाचे आधिपत्याखाली असलेले मंडळ असून याची स्थापना महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ नुसार करण्यात आली आहे. यानुसार कामठी शहरात कामगार कल्याण मंडळ कार्यालय कार्यरत असून आज जवळपास 40 वर्षे लोटूनही हे कार्यालय भाड्याच्या खोलीत कार्यरत आहे.एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे मात्र कामठी शहरातील हे कामगार कल्याण मंडळ कार्यालय स्वहक्कापासून वंचित असून अजूनही भाड्याच्या खोलीत कार्यरत आहे, ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.
महाराष्ट्र राज्यातील कामगारांच्या सर्वांगिण विकासासाठी मंडळ काम करते. यानुसार कामठी चे कामगार कल्याण मंडळ कार्यालय कामगाराच्या हक्कासाठी सदैव कार्यरत असून शिशु मंदिर सह, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती , सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम, तसेच कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना शासकीय योजनेच्या लाभासह कामगार हक्काचे मार्गदर्शन करणे असे विविध उपक्रम राबविण्यात येतात.कामठी चे हे कामगार कल्याण मंडळ कार्यालय हे मागील 40 वर्षांपूर्वी कामठी शहरातील घोडाबाजार चौक येथे कार्यालय भाड्याने उघडण्यात आले होते त्यानंतर बरेच वर्षे जुनी कामठी पोलीस स्टेशन जवळील नाना शिंगनापूरकर यांच्या भाड्याच्या खोलीत कार्यालय कार्यरत ठेवण्यात आले. त्यानंतर वानखेडे हॉस्पिटल च्या वरील भाड्याच्या खोलीत तर सध्या नेताजी चौकातील सुनील कदम यांच्या घरच्या भाड्याच्या खोलीत कार्यरत आहे.आज जवळपास 40 वर्षाचा कार्यकाळ लोटून गेला मात्र महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत सुरू असलेले कामठी चे कामगार कल्याण मंडळ कार्यालय ला स्वहक्काची जागा शासनाकडून देण्यात आले नसल्याने हे कार्यालय अजूनही भाड्याच्या खोलीत कार्यरत आहे.
सदर कार्यालय महाराष्ट्र कल्याण कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी कल्याणकारी योजना राबवितात तेव्हा मागिल 40 वर्षांपासून भाड्याच्या खोलीत कार्यरत असलेल्या कामगार कल्याण मंडळ कार्यालय ला शासनाने स्वहक्काची . जागा केव्हा देणार असा सवाल येथील जागरूक नागरिक करीत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

हिंगना में 15 अगस्त को 375 फिट लंबे तिरंगे की रैली..

Sun Aug 14 , 2022
हिंगना – 75 वा आजादी का अमृत महोत्सव के उपलक्ष्य श्रीराम जनसेना अंतरराष्ट्रीय महासंघ शाखा हिंगना की ओर से हिंगना मुख्य मार्ग पर 15 अगस्त को 375 फिट लंबे तिरंगे की रैली का अयोजन किया गया है। हिंगना एमआईडीसी के बालाजीनगर से रैली का प्रारंभ होकर हिंगना मुख्य मार्ग से होते हुए हिंगना स्थित शिवाजी महाराज चौंक पर समापन होंगा। […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com