घरफोडीच्या गुन्ह्यात चार आरोपींना अटक ; तीन गुन्हे उघडकीस

नागपुर –  दुचाकीसह घरफोडी करणाऱ्या चोरट्यास मानकापुर  पोलिसांनी अटक केली आहे . त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणले असून घरफोडीचे गुन्ह्यातील एकुण 24,82,500/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

प्राप्त माहिती नुसार  पो.स्टे. मानकापुर हद्दीत प्लॉट न. 32,33, बोधड ले-आउट मानकापुर, नागपुर येथे राहणारे फिर्यादी मोहम्मद फैजान अशपाक उद्दीन उमर वय 32 वर्षे हे आपल्या घराला कुलुप लावून भोपाल येथे गेले असता, कोणीतरी अज्ञात आरोपीने घराच्या दाराचे कुलुप तोडुन, आत प्रवेश  करुन, बेडरुममधील लोखंडी लॉकर मधुन, सोन्याचे दागीने असा एकूण 16,75,041/-रु. चा मुद्देमाल चोरुन नेला. मानकापूर पोलीसांनी गुन्हयाची माहिती प्राप्त होताच घटनास्थळाचे आजुबाजूचे सिसीटिव्ही फुटेज ची पाहणी करून परिसरात संशयीतांचा शोध घेवून आधुनिक तांत्रिक पध्दतीने तपास करून दिनांक 28/06/2022 रोजी आरोपी निष्पन  केले व गुन्हा उघडकिस आणून आरोपी 1) इरफान खान हमीद खान, वय 32 वर्षे रा. गांजाखेत चौक, नमक कारखाना पुराना आखाडा चे जवळ पो.स्टे. तहसील नागपूर शहर, 2) मोहम्मद अफसर खान मोहम्मद अख्तर खान, वय 32 वर्षे रा. टिमकी तिन खंबा चौक, साई शु सेंटर समोर, पो.स्टे तहसील नागपूर शहर, 3) सैय्यद नौशाद अली सैय्यद कलीमुद्दीन अली वय 32 वर्ष, रा. बोरगाव चौक, वेलकम सोसायटी, शब्बीर र्भाइं यांच्या घरी किरायाने पो.स्टे. गिट्टीखदान नागपुर शहर यांना ताब्यात घेतले. आरोपीनी घरफोडीचा गुन्हा केल्याचे कबुल केले. गुन्हयातील मुद्देमाल आरोपी क्र 4) विकास उर्फ रिंकु गौरीशंकर गुप्ता, वय 42 वर्षे , रा. हंसापुरी पुराना भंडारा रोड पो.स्टे. तहसिल नागपुर शहर याला विकल्याचे सांगितले. त्यास गुन्हयात अटक केले. आरोपी क्र 1 ते 4 यांचे कडून पीसीआर दरम्यान अप क्र 145/22 कलम 454,457,380 भादवी चा मुददेमाल 1) 65 ग्रॅम पिवळया धातुची कांडी कि.अं. रू. 3,50,000 2) 80 ग्रॅम पिवळया धातुचा लगडी रवा कि.अं. रू. 4,00,000 3) 50 ग्रॅम पिवळया धातुचा लगडी रवा कि.अं. रू. 2,50,000 4) 50 ग्रॅम पिवळया धातुचा लगडी रवा कि.अं. रू. 2,50,000 5) 62.700 ग्रॅम पिवळया धातुचा गोल रवा कि.अं. रू. 3,13,000 6) नगदी रोख रू. 4,56,000/- 7) एक काळया रंगाची अॅक्टीव्हा गाडी कि.अं. रू. 30,000/- 8) एक काळया व हिरव्या रंगाची छज्व्त्फ 125 मोपेड गाडी कि. अं. रू. 1,00,000/- 9) एक पिवळया धातुची अंगठी वजन 2 ग्रॅम किं अं रू. 10,000/-, 10) एक पिवळया धातुची लेडीज अंगठी वजन 2 ग्रॅम किमंत अंदाजे रू. 10,000/- 11) एक पिवळया धातुचे गोल टॉप्स वजन अंदाजे 2 ग्रॅम कि. अंदाजे रू. 10,000/- एकुण रू. 21,79,000/- अप क्र 75/22 कलम 454,457,380 भादवी चे गुन्हयातील 1,31,500/- अप क्र 124/22 कलम 454,457,380 भादवीचे गुन्हयातील 1,72,000/- रू चा मुददेमाल असा एकुण तीन घरफोडीचे गुन्ह्यातील मुद्देमाल 24,82,500/- रू. चा जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी नागपुर शहराचे अप्पर पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांचे निर्देशाप्रमाणे  पोलीस उप आयुक्त परि. क्रं 02 डॉ. संदिप पखाले, सहाय्यक पोलीस आयुक्त  विजयालक्ष्मी हिरेमठ, सदर विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे मानकापूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे, अनिल मांडवे, सपोनि विलास पाटील, सपोनि मंगला मोकाशे, सफौ सुनिल डगवाल, पोहवा राजेश बरणे, नापोअं राहुल गवई,विजय यादव, पोअं प्रविण भोयर, अनुप यादव, मिलिंद नासरे, प्रशांत  खंडारे, विक्रमसिंग ठाकुर, दिपक चौव्हाण यांनी केली आहे .

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com