अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणासमवेत करार करण्यास मान्यता

मुंबई –   राज्यातील अन्न सुरक्षा कार्यप्रणालीचे बळकटीकरण करण्यासाठी नवी दिल्लीच्या अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणासमवेत (FSSAI) सामंजस्य करार करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

            अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणनवी दिल्ली व राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासन यांच्यामध्ये हा सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या कराराचा कालावधी २ वर्षाचा असेल आणि तो परस्पर संमतीने पुढे वाढवण्यात येणार आहे. या करारात  अंमलबजावणी व अनुपालन प्रणालीचे सक्षमीकरण करणेअन्न चाचणी प्रणालीचे सक्षमीकरण करणेईट राईट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत विविध उपक्रमांची प्रभावी अमलबजावणी करणेतसेच अन्न सुरक्षेशी संबंधित इतर बाबींचा समावेश आहे. या करारानुसार अन्न सुरक्षा प्रणालीचे बळकटीकरण करण्यासाठी ६०: ४० या प्रमाणात केंद्र व राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होणार आहे.

            या योजनेअंतर्गत राज्यात २०२१-२२ या अर्थिक वर्षासाठी २१ कोटी ३ लाख ८३ हजार रुपये तरतूदीचा  कृती आराखडा मंजुर आहे. यात राज्य व केंद्र शासनाचा  हिस्सा असणार आहे. चालू आर्थिक वर्षासाठी (सन २०२१-२२) विभागाच्या योजनेतील अर्थसंकल्पीत निधीमधुन खर्च करण्यास तसेच पुढील आर्थिक वर्षासाठी           (२०२२-२३) राज्य हिश्श्याचा निधी अर्थसंकल्पीत करण्याकरिता स्वतंत्र लेखाशीर्ष निर्माण करण्यासही मान्यता देण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

राज्य शासनाच्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा

Thu Feb 3 , 2022
-ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांना जीवनगौरव पुरस्कार           मुंबई : राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे साहित्य क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या साहित्यिकांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांना जाहीर करण्यात आला आहे. पाच लाख रु. रोख, मानचिन्ह आणि मानपत्र, असे पुरस्काराचे स्वरुप आहे. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी या पुरस्कारांची घोषणा केली.             श्री. पु. भागवत पुरस्कार (२०२१) लोकवाङ्मय गृह, मुंबई, या संस्थेला जाहीर करण्यात आला. तीन लाख रुपये रोख आणि मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यास पुरस्कार रमेश वरखेडे यांना जाहीर करण्यात आला. दोन लाख रुपये रोख व मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार (२०२१, व्यक्तींसाठी) डॉ. चंद्रकांत पाटील यांना जाहीर करण्यात आला. डॉ. अशोक केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार २०२१ (संस्थेसाठी) मराठी अभ्यास परिषद पुणे यांना जाहीर करण्यात आला. तर कविवर्य मंगेश पाडगावंकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार २०२१ (संस्थेसाठी) मराठी अभ्यास केंद्र, मुंबई यांना जाहीर करण्यात आला.             यावेळी स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्काराचीही घोषणा करण्यात आली. त्याची यादी खालील प्रमाणे.   अ.क्र. पुरस्कार पुरस्कार प्राप्त व्यक्ती/संस्थेचे नाव पुरस्काराचे स्वरुप अनुभव/कार्य 1. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2021 श्री. भारत सासणे रु. 5 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र विविध साहित्य प्रकारात लेखन, राज्यशासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचे 7 व इतर 30 पुरस्कार प्राप्त, प्रकाशित ग्रथांची संख्या 35 2. श्री. पु. भागवत पुरस्कार  2021 लोकवाङ्मय गृह, मुंबई रु. 3 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!