नागरी तक्रारी प्राधान्याने सोडविण्यावर भर द्या – आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी

– आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या सक्त सूचना

नागपूर :- नागपूर शहरातील नागरिकांना भेडसावणा-या मुलभूत गरजांसंदर्भात मनपाकडे तक्रारी दाखल केल्या जातात, नागरिकांना दर्जेदार सुविधा प्रदान करतानाच त्यांच्या समस्या वेळीच सोडविल्या जाव्यात यासाठी मनपा कार्यरत आहे. तरी अधिकाऱ्यांनी प्राधान्यक्रमाने नागरी तक्रारी सोडविण्यावर भर देत वेळेत त्या समस्यांचे निराकरण करावे अशा सक्त सूचना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नागरी तक्रारींच्या संदर्भात गुरुवारी (ता: 12 ) आयुक्त सभा कक्षात अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत नागपूर महानगर पालिकेला एका वर्षात 19512 तक्रारी विविध माध्यमांवरून प्राप्त झाल्याची माहीती ठेवण्यात आली. प्राप्त तक्रारी मधून 18953 तक्रारी सोडविण्यात आल्या, तर 559 तक्रारींवर प्रक्रिया सुरु आहे. तसेच 274 तक्रारीं सोडविण्या करिता निधीची आवश्यकता आहे. बैठकीत माहिती देण्यात आली की, मनपा तर्फे 13016 तक्रारींचे निवारण विहित कालावधीत करण्यात आले. मनपा तर्फे तक्रारींचे निवारण करण्याकरिता विशिष्ट कार्यपद्धती विकसित करण्यात आली आहे. मनपा आयुक्तांनी नागरिकांना आपल्या तक्रारी ‘माय नागपूर’ अँपच्या माध्यमाने नोंदविण्याचे आवाहन केले आहे.

बैठकीत मनपाचे अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल,  अजय चारठाणकर, मुख्य अभियंता लीना उपाध्ये, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, डॉ. श्वेता बॅनर्जी, मुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी चंदनखेडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, सहायक आयुक्त सर्वश्री. मिलिंद मेश्राम, प्रकाश वराडे, नरेंद्र बावनकर, गणेश राठोड, प्रमोद वानखेडे, हरीश राऊत, घनशाम पंधरे, अशोक घरोटे, विजय थूल, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे स्वप्नील लोखंडे, यांच्यासह कार्यकारी अभियंता, इतर अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

बैठकीत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या तक्रारी प्राधान्यक्रमाने सोडविण्यावर भर देत आपल्याकडे येणाऱ्या तक्रारींचे रीतसर नियोजन करावे, नियमितपणे प्रलंबित तक्रारींच्या कार्यवाहीचा पाठपुरावा करावा, नागरिकांकडून येणा-या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी मनपा मुख्यालयात तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित करावी, या यंत्रणेत कार्यरत कर्मचा-यांना मनपा आयुक्तांनी प्रत्येक तक्रारीला प्राधान्याने वेळ देऊन ती संबंधित विभागाकडे वर्ग करून त्याचा पाठपुरावा करावा, तसेच तक्रारदारांना समाधानकारक प्रतिसाद देण्याबाबत आयुक्त डॉ. चौधरी यांनी निर्देशित केले.

याशिवाय सर्व झोनल अधिकारी आणि विभाग प्रमुखांनी स्वतः जबाबदारीने तक्रार निवारण प्रणालीकडे लक्ष द्यावे, तसेच कामात हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी, कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्वरित नोटीस देण्यात यावी, त्यांच्याकडून समाधान कारक उत्तर न मिळाल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात यावी असे निर्देश आयुक्त डॉ. चौधरी यांनी दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पुन्हः एकदा अंधेरे मे एक प्रकाश जयप्रकाश - जयप्रकाश !

Fri Sep 13 , 2024
सन 1975-77 मध्ये काँग्रेसच्या इंदिरा गांधी सरकारने स्वतःचा बचाव करण्याकरिता देशात 25 जून 1975 ला आणिबाणी लावली त्या विरोधात लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी आणिबाणीचा निषेध करून जनआंदोलन पुकारले. त्यांत अटलबिहारी बाजपेई, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, पण्णालाल सुराणा, निहाल अहमद इत्यादी जेष्ट नेत्यांना रातोरात कारागृहात बंद केले. संपूर्ण भारत भर घटनेतील सामान्य जनतेचे मुलभूत अधिकारावर गदा आलेमुळे जनतेचे सप्तस्वातंत्र हिरावून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com