संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नगर परिषद कामठी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रभाग 15 रमाई नगरातील 60-70 घरांना पाईप लाईन जोडणी अभावी गत 15-20 वर्षा पासुन पाणी पुरवठा होत नव्हता,कित्येक नगरसेवक,अध्यक्ष आले न गेले. परंतु हा भाग तहाणलेला होता.
भाजपच्या माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी पहिल्या दिवसा पासुनच पाणी समस्या प्रश्न गांभीर्याने घेऊन सतत पाठ पुरावा केला. मुख्याधिकारी, पाणी पुरवठा अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी तत्कालीन पालकमंत्री यांना थोड़ी थोड़की नव्हे तर एकून 25 निवेदनं दिली,हंडा मोर्चा,माठ फोड़ो, थाली नाद आंदोलन केली. पण नगर परिषद प्रशासन ऐकत नव्हते, शेवटी आपली सरकार असून काय फायदा अस म्हणण्याची वेळ आली. पाणी नाही तर मतदान नाही म्हणत येथील नागरिकांनी मतदान वर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सहायक निवडणुक निर्णय अधिकारी सचिन गोसावी आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांना लेखी स्वरूपात कळविला होता.
भाजपा प्रदेशाध्यक्ष विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुले यांच्या म्हणण्या वर रमाई नगरातील लोकांनी मतदान वर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागे घेतला.भाजपा प्रदेशाध्यक्ष विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशा नंतर रमाई नगरातील पाईप लाईनचे काम आता युद्धस्तरावर सुरु झाले आहे.ते काम लवकरत लवकर पुर्ण करण्याची मागणी माजी नगरसेविका संध्या रायबोले, शंकर चवरे, ऋषि दहाट, रतन रंगारी, मनोज वासनिक,राहुल भगत,पंचशिला गोंडाने, अंजू कांबळे, गिरिजा जाधव, अनिता शेंडे यांनी केली आहे.