– पेंच कालव्यात आंघोळीसाठी गेलेल्या ४ विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले
– रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांना सोपविले
रामटेक :- बोरी येथील इंदिरा गांधी वसतिगृहात राहणारे मनदीप अविनाश पाटील (१६ वर्षे), मयंक कुणाल मेश्राम (१३ वर्षे), मयूर खुशाल बांगरे (१५ वर्षे), खिंडसीजवळील घोटी चौक, तिघेही नागपूरचे आणिअनंत योगेश सांभारे (१२ वर्षे, गुमथळा) हे ४ विद्यार्थी वसतिगृहाला लागून असलेल्या पेंच च्या नहरामध्ये १४ ऑक्टोंबर ला आंघोळीसाठी गेले होते. दरम्यान गतीने वाहनाऱ्या नहराच्या पाण्यात ते वाहुन गेले होते. आंधार पडतपर्यंत शोधमोहीम चालवुनही पोलीसांच्या हाती मृतदेह आले नव्हते.
आज १५ ऑक्टोबर ला पहाटे पासुनच पोलीसांनी शोधमोहीम राबविली तेव्हा सालईमेटा जवळ दोन, शिवणीजवळ एक आणि थोड्या अंतरावर एका विद्यार्थ्यांचे मृतदेह आढळून आले. चारही मृतदेह रामटेक उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले येथे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. मनदीप पाटील हा कुटुंबात एकुलता एक मुलगा होता. त्याला दोन बहिणी आहेत. आई परिचर आणि वडील आचारी म्हणून काम करतात. मयंक मेश्राम च्या कुटुंबात दोन भाऊ होते. आई-वडील मजूर म्हणून काम करतात. अनंत सांभारे या विद्यार्थ्याच्या कुटुंबात दोन भाऊ होते. आई-वडील मजूर म्हणून काम करतात. मयूर बांगरे हे दोन भाऊ आहेत. वडीलांचा मृत्यू झाला आहे. काका पालन पोषण करीत होते. सर्व गरीब कुटुंबातील मुले होती. आई – वडील आणि कुटुंबीयांवर दुःखाचा जणु डोंगर कोसळला आहे.
माहिती मिळताच एसडीओ प्रियेश महाजन, एसडीपीओ रमेश बरकते, तहसीलदार रमेश कोळपे, ठाणेदार रामटेक आसाराम शेटे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सालईमेटा परिसरातील कालव्याच्या पुलाजवळ जाळे लावण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या शोधासाठी नागपुरातील राज्य आपत्ती व्यवस्थापन पथक (एसडीआरएफ) कर्मचारीही तैनात करण्यात आले होते.