अखेर..खड्डयात बसून गांधीगिरी आंदोलनाची प्रशासनाने घेतली दखल

– खड्डे झाले गुळगूळीत ….!

भंडारा :- शहरातील मुख्य रोडावरीत एक रोड म्हणजे मुस्लीम लायब्ररी चौक मधील रोड या रोडावर गेल्या वर्षा भरा पासून अनेक खड्डे पडल्या नंतर देखील माजी खासदार व आमदार यांनी खड्डयाकडे लक्ष न देता फक्त आपल्या राजकीय कामात व्यक्त असल्याने या रोडाला फक्त राजकीय फटका बसल्याने वर्ष भरात अनेक युवक व वृध्द यांचे छोटे अपघात होवून जखमी झाले आहेत.अनेक नागरीक जखमी झाले असले तरी देखील लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणा हे साधी या खड्डयाची दखल घेत नसल्यामुळे या खड्डयाकडे प्रशासनाचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी मुस्लिम लायब्ररी चौकासमोरील रस्त्यांवर पडलेल्या खड्यांवर दिनांक १४ मे रोजी रोडावर चक्क रांगोळी काढत खड्डयातच बसून गांधीगिरी करत हे नवखे एल्गार पुकारुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांनी शासनाचे लक्ष वेधले होते.

याच आंदोलनाची प्रशासनाने दखल घेत लोकसभा निवडणूकी करीता लागलेली आचार संहिता संपताच रोडाच्या कामाला लागले असल्याने अनेक वर्षा पासून फुटलेल्या रोड आता गुळगूळीत होत असल्याचे पाहुन सामान्य नागरीकांनी अजय मेश्राम यांच्या खड्डयात बसुन केलेल्या आंदोलनाची दखल घेतली याचे समाधान व्यक्त करीता भेट देत त्यांना शहरातील अनेक समस्याकडे लक्ष केंद्रीत करीत समान्य जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याचे देखील सामान्य नागरीकांनी सुचना केले. पाऊसाळयात मुस्लिम लायब्ररी चौकासमोरील खड्डयान पासून एका आंदोलना मुळे मुक्ती मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांचे व प्रशानाने या आंदोलनाची दखल घेतल्याने प्रशासनाचे देखील नागरीकांना अभिनंदन केले आहेत.

मुस्लिम लायब्ररी चौकासमोरील खड्डे हे वर्षा भरा पासून पडले असल्याने या परिसरात मोठया प्रमाणात कॉलेज मध्ये येणारे मुल-मुली तसेच शासकीय कर्मचारी मोठया प्रमाणात येणे जाणे करीत असतात मात्र गाडी सामन्य गती मध्ये देखील असल्याने या खड्डयात अनेक वृध्द व युवती पडून जखमी झाल्याने प्रशासनाचे लक्ष या खड्डयाकडे केंद्रीत करण्यासाठी या अनोखा आंदोलन करण्यात आले यात प्रशासनाने याला गंभिर्याने घेत खड्डे बूजविण्याचे कार्य पुर्ण केल्याने नगरपरिषद मुख्याधिकारी यांचे आभार.

अजय मेश्राम,विधानसभा अध्यक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार   

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूरमधील आरोग्य सुविधांसाठी 507 कोटी रुपये तत्काळ उपलब्ध करू - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Thu Jun 20 , 2024
Ø 615 खाटांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र Ø नागपुरातील विविध प्रकल्पांच्या कामांना गती नागपूर :- नागपूरमधील मेडिकल, मेयो आणि अन्य आरोग्य सुविधांसाठी 639 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यातील काही निधी दिला आहे, तर उर्वरित 507 कोटी रुपयांचा निधी तत्काळ देण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. नागपुरातील विविध प्रकल्पांचा आढावा घेताना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com