महागाव तालुक्यात खरीप पिकांना क्षेत्रीय भेटी व शेतकऱ्यांशी चर्चा

यवतमाळ :- महागाव तालुक्यात खरीप हंगाम पीक पाहणी व पिकावरील विविध प्रकारचे कीड व रोगावरील प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकऱ्यांनी करावयाच्या उपायोजना याबाबत क्षेत्रीय भेट व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

भेटीच्या वेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे, आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे,मध्य विदर्भ विभागाच्या राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक डॉ.प्रमोद यादगीरवार, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ.सुरेश नेमाडे, कीटकशास्त्रज्ञ डॉ.प्रमोद मगर, वनस्पती विकृती शास्त्रज्ञ डॉ.वसुले, फळबाग तज्ञ डॉ.गहरवाल, कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.हीरवे, उपविभागीय कृषी अधिकारी महेश वैद्य, विजय सरोदे,समाधान धुळधूळे त्याचप्रमाणे सर्व तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी, ज्या क्षेत्रावर भेटीचे नियोजन करण्यात आले होते तेथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रक्षेत्र भेटीत उटी येथील प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आलेले रखुमाई हळद प्रक्रिया युनिट या हळद प्रक्रिया उद्योगाला भेट देण्यात आली व उत्पादीत होणाऱ्या हळदची विक्री व विपणन व्यवस्थेविषयी माहिती घेण्यात येऊन संबंधित गटाला शास्त्रज्ञांनी यथोचित मार्गदर्शन केले.

त्यानंतर अंबोडा येथील भाऊराव संभाजी पावडे यांच्या सोयाबीन पिकाची पाहणी करण्यात आली. सदर क्षेत्रावर पेरणी करण्यात आलेले सोयाबीनचे वाण 9305 असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले व बियाणे रवी सीड कंपनीचे असल्याचे सांगितले. सोयाबीन पिकावर येलो व्हेन मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निदान शास्त्रज्ञांनी केले. सदर रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीमुळे होत असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणाकरिता योग्य त्या उपयोजना करण्याविषयी शेतकऱ्यांना खालील प्रमाणे मार्गदर्शन केले.

पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना पुढील प्रमाणे. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेत तनमुक्त ठेवावे. बांधावर असणाऱ्या पूरक खाद्य वनस्पतीचा नाश करावा. विषाणूजन्य रोगाने ग्रस्त झाडे आढळून आल्यास अशी झाडे उपटुन नष्ट करावी. एकरी 30 ते 40 पीवळे चिकट सापळे लावावेत. शिफारशी नुसार सोयाबीन पिकात संतुलित खत मात्रा द्यावी. अनावश्यक खतांचा वापर टाळावा. प्रमाणापेक्षा जास्त मात्रेत कीडनाशकांचा वापर टाळावा. पांढऱ्या माशीच्या प्रभावी व्यवस्थापनाकरीता एसीटामीप्रीड 25 टक्के अधीक बायफेन्थ्रीन 25 टक्के डब्ल्यु जी हे संयुक्त कीटकनाशक 5 ग्राम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.

भेटीदरम्यान वेणी बु. येथील शरथ भिमराव पुंडे यांच्या शेतातील अंकुर प्रभाकर या सोयाबीन पिकाची पाहणी केली. सदर सोयाबीनच्या बेडवर पेरणी करण्यात आल्यामुळे पिकाची अवस्था अतिशय उत्तम होती. मनुष्य चलित टोकन यंत्राद्वारे पेरणी केल्यामुळे एकरी फक्त 12 ते 15 किलो बियाणे लागल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सदर सोयाबीन पिकाच्या अवस्थेविषयी शास्त्रज्ञांनी समाधान व्यक्त केले व एक दोन पिवळे पडलेले झाड शेतकऱ्यांनी काढून टाकावे व त्याचा नायनाट करावा असा सल्ला देण्यात आला. तसेच तुकाराम काशिनाथ जगताप यांच्या पोहंडूळ येथील कापूस पिकाची पाहणी करण्यात आली. सदर शेतकऱ्याला शास्त्रज्ञांनी रस शोषण करणाऱ्या कीडीविषयी करावयाच्या उपाययोजना बाबत मार्गदर्शन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित

Fri Aug 2 , 2024
यवतमाळ :- जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी 2025 करिता प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असुन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर आहे. शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये वर्ग 5 वीत शिकत असलेले विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करण्यास पात्र आहेत. ही निवड चाचणी शैक्षणिक सत्र 2025-26 वर्ग 6 मध्ये प्रवेशाकरिता आहे. अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरायचे आहे. निवड चाचणी शनिवार दि. 18 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com