राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथि समारोह

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- सर्वांना सत्य व अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 75 व्या पुण्यतिथीनिमित्त आज 30 जानेवारी ला सकाळी 9 वाजता गांधी भवन, कामठी येथे “फाॅंडेशन फाॅर यु” च्या वतीने राजघाट ( बापूंच्या समाधि प्रतिकृती ) वर सामूहिक अभिवादन वाहण्यात आले तसेच सामूहिक सर्वधर्म प्रार्थना ( सेवाग्राम आश्रम ची ) करून राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक,माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर, कामठी कांग्रेस अध्यक्ष कृष्णा यादव, कांग्रेस पदाधिकारी तुषार दावानी, मनोज यादव,प्रमोद गेडाम,आशिष मेश्राम, मो सुलतान ,मो राशीद,सुशांत यादव आदी कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्तेगन मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com