मुंबई :- राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव दीपक मोरे, सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे व राजेंद्र बच्छाव यांच्यासह मंत्रालयीन अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.