कामठी पंचायत समितीच्या सभापती पदी कुणाची वर्णी लागणार?

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी

१५ ऑक्टोबर ला होणार निवडणूक, बहुमत काँग्रेसकडेच 

कामठी,ता.13 : येत्या १५ ऑक्टोंबरला दुपारी दोन वाजता सभापती व उप सभापतींची निवडणूक होणार असून १० तारखेला नागपूरला याबाबत आरक्षण निश्चित करण्यात आले ज्यामध्ये कामठी पंचायत समिती सभापती पद हे सर्वसाधारण महिला साठी आरक्षित करण्यात आले त्यानुसार आठ सदस्य असलेल्या कामठी पंचायत समिती मध्ये कांग्रेसचे पाच सदस्य आहेत ज्यामध्ये सोनू मनोज कुथे व दिशा छबिलाल चंद्रिकापुरे या दोन महिला सदस्यांचा समावेश आहे तर भाजपच्या तीन सदस्यांमध्ये सविता जिचकार व पूनम मालोदे चा समावेश आहे यावरून कांग्रेस ला बहुमत असल्याने कांग्रेस पक्षाचा सभापती ,उपसभापती होणार असल्याने या सभापती पदी दिशा चंद्रिकापुरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्या असल्याची चर्चा जरी रंगत असली तरी राजकीय चक्रव्यूहात केव्हा काय होईल काही निश्चिती नसते तेव्हा राजकीय खेळामेळीत भाजप ने राजकारण केल्यास एक सदस्य खेचून आणत फिफ्टी फिफ्टी ची रणनीती करून ईश्वरचिट्ठीचा उपयोग तर करणार नाही ना?याही चर्चेला उधाण आहे.

मागील 8 जानेवारी २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकी मध्ये चार काँग्रेस तर चार भाजपचे सदस्य निवडून आल्याने 17 जानेवारी ला सभापती व उप सभापतींची निवडणूक चांगलीच रंगली होती होती सभापती पदावर ईश्वर चिठ्ठीने भाजपचे उमेश रडके निवडून आले होते तर उपसभापती पदी आशिष मल्लेवार निवडून आले होते यांचा कार्यकाळ जुन महिन्यात संपुष्टात आला. ओबीसीचे आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याने नवीन सभापती व उपसभापतीची निवडणूक करण्यात आली नाही अखेर तालुक्यातील दोन पंचायत व दोन जिल्हा परिषद सदस्यासाठी निवडणूक घेण्यात आली यात भाजपचे एक सदस्य कमी झाले कामठी पंचायत समिती मध्ये २०१७ च्या निवडणुकीत भाजप व काँग्रेस कडे चार चार सदस्य होते. उप चुनाव नंतर आता मात्र काँग्रेसकडे पाच तर भाजप कडे तीन सदस्य आहेत. येणारा सभापती हा काँग्रेस पक्षाचा निवडून येणार असल्याची दाट शक्यता आहे. उमेदवार निवडीचे अधिकार पूर्व जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या कडे असणार असल्याचे बोलले जात आहे तरी सुद्धा काँग्रेस कुणाला उमेदवार बनविणार हे येत्या 15 तारखेला होणाऱ्या सभापती उपसभापती पदाच्या निवडणुकीत स्पष्ट होईल.

उप चुनाव नंतर पंचायत समिती मध्ये काँग्रेसचे पाच सदस्यामध्ये सुमेध मधुकर रंगारी, सोनू मनोज कुथे, दिशा छबिलाल चंद्रिकापुरे, दिलीप तुळशीराम वंजारी, आशिष मल्लेवार तर भाजपच्या तीन सदस्यांमध्ये उमेश भगवंतराव रडके, सविता रामचंद्र जिचकार, पूनम समीर मालोदे आहेत. पूर्वी दोन्ही पक्षाकडे चार -चार सदस्य असल्याने निवडणूक अटी-तटीची ठरली परंतु या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या फूट पडणार नसल्यास काँग्रेसचाच सभापती निवडून येणार हे मात्र नक्कीच.

१५ ऑक्टोंबरला सकाळी ११ वाजता सुरू होणारी नामनिर्देशन प्रक्रियेपासून तर दुपारी २ वाजता पर्यंत निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.

आतापर्यंत पदे भूषविलेले सभापती

ज जा काळे, बा व शहाणे, दे स रडके, सु वि तकीत, सु तू काकडे, सु सा वानखेडे, पू प शहाणे, वेणूताई महल्ले, पू प शहाणे, रमेश दयाराम भोयर, अंबर सावजी वाघ, सचिन श्यामराव मानवटकर, वसंतराव काळे, बेबीताई काळे, सेवकराम उईके, रामकृष्ण वंजारी, कमलाताई खेडकर, संगीता तांबे, अनिता रमेश चिकटे,तसेच उमेश रडके चा समावेश आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com