संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 09 :- पवित्र रमजान महिन्यात रोजा व नमाजमुळे मनाला शांती मिळते ,जीवनामध्ये नवचैतन्य निर्माण होते.व मनुष्य सत्याच्या मार्गाकडे जातो .या पवित्र महिन्यात सर्व मुस्लिम बांधव मनापासून अल्लाप्रति ईबादत करतात .रमजान निमित्त एक महिना उपवास करून पाच वेळा नमाज अदा करतात ज्यामुळे सामाजिक सलोखा व बंधुभाव निर्माण होतो .असे मौलिक मत पोलिस उपायुक्त श्रवण दत्त यांनी इमलिबाग स्थित मुस्लिम समाज भवन येथे सर्व सामाजिक संस्था च्या वतीने आयोजित इफ्तार पार्टी कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी गुन्हे पोलीस निरीक्षक निरीक्षक कमलाकर गड्डीमे ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे,माजी नगराध्यक्ष शकुर नागांनी,राजे भोंसले,माजी नगराध्यक्ष मायाताई चवरे यासह विविध धर्मीय धर्मगुरू आदी उपस्थित होते.
कामठी शहरात हिंदू मुस्लिम बंधुभाव व भाईचारा, सामाजिक ऐक्य घडून आणण्याचे काम दोन्ही समाजाकडून करण्यात येते ज्याचा आदर्श घेण्याजोगा आहे.इफ्तार पार्टीत हे सामाजिक दर्शन झाले.यावेळी सर्व मुस्लिम बांधवांनी अल्लाहकडे शांती,अमन व सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी दुवा मागितली.सर्व उपस्थित मान्यवर तसेच बहुजन समाजाच्या प्रतिनिधींनी मुस्लिम समाजबांधवाना पवित्र रमजान व उपवासाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व सामाजिक संस्थेच्या वतीने मोलाची भूमिका साकारण्यात आली.