शेतक-यांनी एक रूपयात विमा योजनेचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी

भंडारा :- प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत फक्त १रु. प्रति अर्ज करुन विमा काढण्याची कार्यवाही सुरुआहे. त्यासाठी अंतिम तारीख 31 जुलै असुन संबंधित विमा कंपनी, बँक तथा कृषि विभागाचे अधिकारी यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले. कृषि विभागाच्या विविध योजनांचा नुकताच त्यांनी आढावा घेतला.

तसेच जिल्हा अग्रणी बँक यांनी बँक निहाय व आपले सरकार केंद्राचे जिल्हा नोडल अधिकारी यांनी केंद्रनिहाय तथा ग्रामपंचायत- गावनिहाय नोंदणी प्रगतीचे संनियंत्रण दररोज करणे बाबत निर्देश दिले. वन हक्क पटटेधारकांची सुध्दा विमा नोंदणी विमा कंपनीने बँकेशी संपर्क साधण्याची सूचना त्यांनी केली.

जंगली जनावरांमुळे होणाऱ्या शेत पिकांचे नुकसानीचे संदर्भातील झालेल्या नुकसानीच्या 80 टक्के रु. व 25 हजाराच्या कमाल मर्यादेत आर्थिक मदत देय असुन नजीकच्या वनरक्षक, वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे घटनेच्या ३ दिवसांचे आत तक्रार करावी किंवा mahaforest.gov.in यापोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवण्याचे वनविभागाकडुन सांगण्यात आले.

प्रयोगशील शेतकऱ्यांचे सभेत सौर उर्जाचलीत झटका मशीनद्वारे काही शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यांपासुन पिके वाचविता येत असल्याचे अनुभवातून सांगितले. त्याकरिता सदर बाब केंद्रशासनाच्या यांत्रिकीकरण उप अभियानात समाविष्ट करण्याकरिता प्रस्तावित करण्याच्या सुचना कृषि विभागास जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

केंद्रशासन व राज्यशासन यांच्या एकत्रित अनुदानातून शेतकऱ्यांना सुक्ष्म सिंचन – तुषार/ ठिंबक संचाकरिता अल्पभुधारक यांना ८० टक्के , मोठे शेतकरी यांना ७५ टक्के तर अनुसुचित जाती व जमाती व नवबौध्द प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदान देय असल्यामुळे वाढीव आराखडा तयार करुन मोहीम स्वरुपात काम करुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभान्वित करावे, असे निर्देश कृषि विभागास दिले.सभेमध्ये कृषि यांत्रिकी करण, कोरडवाहू क्षेत्र अभियान, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेच्या वार्षिक आराखडयास मंजुरी देण्यात आली.

केंद्र शासन सहाय्यीत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा सुध्दा यावेळी आढावा घेण्यात आला.

सभेदरम्यान जिल्हयातील नाविन्य पुर्ण उपक्रम राबविणारे (रिसोर्स फार्मर्स) प्रगतीशील शेतकऱ्यां सोबत जिल्हाधिकारी यांनी चर्चा करुन भात उत्पादक शेतकऱ्यांचे अनुभव जाणुन घेतले तसेच सोबत समस्या देखील जाणुन घेतल्या इतर नगदी पिके, फळबाग व भाजीपाला लागवड करुन उत्पादन वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करावे व इतर शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहित करुन प्रगतीसाधण्याचे आवाहन केले.

या बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, संगिता माने, उपविभागीय कृषि अधिकारी अविनाश कोटांगले, , उपविभागीय कृषि अधिकारी, साकोली किशोर पात्रीकर, अग्रणी बँकेचे जिल्हास्तरीय अधिकारी तईकर, जिल्हा महाव्यवस्थापक, महाउर्जा पाटेकर, सर्व तालुका कृषि अधिकारी तसेच इतर विभागाचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कृषि आधारित योजनाओं का लाभ उठाएं - सीए जुल्फेश शाह

Tue Jul 25 , 2023
नागपूर :- भारत सरकार के कृषि मंत्रालय के तत्वावधान में ऐसी कई योजनाएं हैं जो कृषकों और कृषि आधारित परियोजनाओं के लिए फायदेमंद हैं, जो पात्र परियोजनाओं के लिए विभिन्न अनुदान और सब्सिडी प्रदान करती हैं। इस कृषि क्षेत्र से जुड़े उद्यमियों/कृषकों को अपनी परियोजनाओं के लिए अधिकतम लाभ उठाना चाहिए, यह बात सीए जुल्फेश शाह, प्रसिद्ध प्रोत्साहन सलाहकार और […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com