संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-खरीप पीककर्ज वाटप योजनेंतर्गत कामठी तालुक्यात 53 कोटी 7 लक्ष रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट
कामठी ता प्र 2 ऑगस्ट :- सन 2022-23 च्या खरीप हंगामात शेतकरी सावकाराच्या दारात कर्जासाठी उभे न राहावे यासाठी शासनाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा खरीप पीक कर्ज वाटप करण्यात येत आहे.या खरीप पीककर्ज वाटप योजनेंतर्गत कामठी तालुक्यातील 4366 लाभार्थी खातेदारांना 53 कोटी 07 लक्ष रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून यावर्षी 31 जुलै 2021 पर्यंत 1665 लाभार्थी शेतकऱ्यांना 16 कोटी 65 लक्ष 42 हजार रुपयांचे कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित कर्जवाटप कामठी तालुक्यातील राष्ट्रीय कृत आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून पीककर्ज वाटप होणार असून, शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार टेकचंद सावरकर यांनी आज कामठी तहसील कार्यालयात आयोजित खरीप पीक कर्ज आढावा बैठकीत केले. तसेच ज्या बँकेतर्फे लाभार्थी शेतकऱ्याला पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करनाऱ्या बँके संदर्भात शेतकऱ्यांनी सहाय्यक निबंधक कार्यालयाशी थेट संपर्क साधण्याचे सुद्धा आव्हान करण्यात आले आहे.
कामठी तालुक्यात राष्ट्रीय कृत , खाजगी बँका व सहकारी बँका मिळून एकूण 28 बँक शाखा आहेत . यातील फक्त 12 बँक खरीप पीक कर्ज वाटप करतात तर उर्वरित 16 बँक कर्ज वितरित करीत नसल्याचे दिसून येते तेव्हा सदर बँकेने आपला तांत्रिक अडचणीचा विषय बाजूला सारून शेतकऱ्यांचे खरीप पीक कर्जाच्या विषयाला प्राधान्य देऊन गरजू लाभार्थी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करा असे निर्देश आमदार टेकचंद सावरकर यांनी दिले.
बँकेतून इच्छुक लाभार्थी शेतकऱ्याला खरीप पीक कर्ज मिळणार आहे.शेतकऱ्यांनी या बँके सोबत संपर्क साधून योग्य त्या कागदपत्राची जोड करून खरीप पिक कर्ज उचलून शासनाच्या खरीप पीक कर्ज योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार सावरकर यांनी केले आहे.
याप्रसंगी कामठीचे सहाय्यक निबंधक अनिल गोस्वामी, नायब तहसीलदार राजीव बमनोटे,पंचायत समिती कामठी चे गटविकास अधिकारी अंशुजा गराटे, सभापती उमेश रडके, तालुका कृषी अधिकारी मंजुषा राऊत यासह बँकेचे प्रबंधक वर्ग उपस्थित होते.