माती डम्पींग धुळ प्रदुर्शन व शेतीच्या नुकसान वर उपाय करण्याचे अधिका-यांची कबुली.
कन्हान : – कामठी उपक्षेत्र अंतर्गत इंदर खुली कोळ सा खदान माती डम्पींगमुळे शेतीत धुळीच्या प्रदुर्शनाने भाजीपाला पिक तसेच मातीच्या उंच टेकडयानी पाव साळयात पाणी साचुन दरवर्षी शेत पिकाचा नापिकी ने त्रस्त शेतकरी वारंवार धुळीचे प्रदुर्शन व पावसाळया तील पाणी योग्य रित्या निकासी उपाय करावे. युवका ना रोजगार देण्याची मागणी केली. पावसाळा तोंडावर येऊन सुध्दा वेकोलि दुर्लक्ष करित असल्याने वराडा सरपंचा विद्या चिखले च्या नेतुत्वात शेतक-यांनी इंदर माती डम्पींग स्थळी आंदोलनाने माती वाहतुक ठप्प होऊन वेकोलि अधिका-यास माती डम्पींगने होणारे धुळीचे प्रदुर्शन आणि पाणी साचुन शेतपिकाचे होणारे नुकसान थांबविण्याच्या उपाययोजना करण्यास बाध्य केले. यानंतर जर परत त्रास झाल्यास तिव्र जनआंदोल न करण्याचा इशारा शेतक-यानी दिला.
वेकोलि कामठी उपक्षेत्र अंतर्गत इंदर खुली कोळ सा खदान ची माती डम्पींग करिता ग्रा प वराडा शेत शिवारातील शेती अधिग्रहीत करून मोठया ट्रक व्दारे माती टाकुन उंच टेकडया तयार करण्यात येत आहे.या माती डम्पींग मुळे दुरवर शेतात धुळ उडुन तसेच पाव साळयात मातीच्या टेकडयावरून पाण्यासह माती वाहु न व पाणी साचुन शेतपिकाचे नुकसान होते. भरपाई म्हणुन वेकोलि व्दारे नाममात्र शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली जाते. तसेच पावसाळयात कन्हान नदी तुडुंब वाहताना पेंच नदीचे पाणी याच रामेश्वर मोठया नाल्याने वाहते परंतु वेकोलिने माती डम्पींग याच रामे श्वर परिसरात करून उंच टेकडया केल्याने पुरपरिस्थि त पेंच नदीच्या पुराच्या पाण्याने शेतीसह वराडा, टेका डी, गोंडेगाव, घाटरोहणा गावाना पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
देशहितार्थ वेकोलि कामठी व गोंडेगाव उपक्षेत्र अंतर्गत कोळसा उत्खनन करणे जसे गरजेचे आहे. तसेच या परिसरातील शेतकरी, गावकरी जगणे तितके च महत्वाचे असल्याने वेकोलि प्रशासनाने येथील शेत करी गावक-यावर अन्याय करणे थांबवावे. यास्तव वे कोलि कामठी उपक्षेत्रिय प्रबंधकास वारंवार ग्राम पंचा यत व शेतक-यांनी पत्र देऊन वेकोलि निर्मित समस्या सोडविण्यास विनंती करून सुध्दा वेकोली प्रशासन दुर्लक्ष करित असल्याने पावसाळा जवळ येऊन सु़ध्दा वेकोलिच्या माती डम्पींगचे धुळ प्रदुर्शन रोखण्याचे उपाय करित नसल्याने ग्रा प वराडा सरपंच, उपसरपंच याच्या नेतुत्वात वराडा शेतक-यांनी इंदर खुली खदान माती डम्पींग शेतशिवारात रस्त्यावर आंदोलन केल्याने काही काळ ट्रकने माती वाहतुक ठप्प झाल्याने काम ठी उपक्षेत्रिय प्रबंधक मा. दिक्षीत, कंत्राटदार छठवाल कंपनीचे त्रिपाठी व वेकोलि सुरक्षा अधिकरी, सुरक्षा रक्षक पोहचले असता आंदोलक शेतकरी माती धुळीचे प्रदुर्शन होऊ नये म्हणुन पाणी मारण्यात यावे. वेकोलि अधिग्रहीत माती डम्पींग भोवती मोठा नाला खोदुन पावसाळयाचे पाणी व्यवस्थित निकासी होईल. शेतात पाणी साचुन शेतपिकाचे नुकसान होणार नाही. गावा लगत खोलगट भागात माती टाकुन दयावी.
गावाची शेती अधिग्रहीत केल्याने गावातील बेरोजगार युवका ना कंत्राटी कामावर घेण्यात यावे. वेकोलि खुली खदा न व्दारे निर्माण समस्या तातडीने सोडविण्यात याव्या आदी मागण्यावर आंदोलक ठाम असल्याने उपक्षेत्रिय प्रबंधकांनी कंत्राटदारास लगेच वराडा गावच्या खोलग ट भागात माती टाकण्यास सांगितले. पावसाचे पाणी निकासी मोठा नाला बनवुन इतर समस्या त्वरित सोड विण्यास आश्वस्त केल्याने माती वाहतुक सुरू करण्या त आली. याप्रसंगी ग्राम पचायत वराडा सरपंचा विद्या ताई चिखले, उपसरपंच उषाबाई हेटे, ग्रा प सदस्या संगिताबाई सोनटक्के, सिमाताई शेळकी, सदस्य संज य टाले, कविता मेश्राम, सुभागी घारड, कल्पना घाटोळे , दिलीप चिखले, आनंदराव गुरांदे, किशोर चिखले, विजय घाटोळे, मारोती जामदार, सुरेशजी हेटे, हर्षल नेवारे, संजय मेश्राम, मंगेश खंडार, श्रावण पाटील, अल्केश तेलंगे सह वराडा ग्रामस्थ शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.