शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा पैसे खात्यावर येईना!

संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 12:-कामठी तालुक्यातील शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या प्रतीक्षेत असताना बहुतेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसेच आलेच नसल्याचे वास्तव आहे.
मागच्या वर्षीच्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत आहे.पावसाळा तोंडावर आला असून शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीत आहे परंतु नापिकीमुळे त्यांच्याजवळ पैसाच नसल्याने पीक विमा योजनेची मंजूर रक्कम मिळेल किंवा पंतप्रधान किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळेल अशी अपेक्षा बाळगून आहेत त्यातून काहीसा आधार होईल या आशेवर शेतकरी आहेत असे असताना केंद्र सरकार कडून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा दोन हजार रुपयांचा हफ्ता जमा झाल्याचा प्रत्यक्ष अनुभव शेतकऱ्यांना आला नसल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

रासायनिक खतांच्या अति वापराने जमिनीतील मुख्य पोषक तत्वे नामशेष होण्याच्या मार्गावर

Thu May 12 , 2022
संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 12:-आधुनिकतेच्या काळात नवीन तंत्र वापरून शेतीपिकांचे उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न सुरू असून उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होत असल्याने जमिनीतील मुख्य पोषक तत्वे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे शेती बंजार होण्याची शक्यता आहे. किमान दहा वर्षांपूर्वी शेतकरी शेती व्यवसायाबरोबर गाय, म्हैस, बैल, शेळ्या आदी पाळीव जनावरे पाळत असतात शेतीपूरक व्यवसाय म्हणूनही त्यांचा वापर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com