वीज कोसळून शेतकरी महिलेचा मृत्यू

नितीन लिल्हारे

मोहाडी : विजांच्या कडकडाटासह झालेल्या वादळी पावसात अंगावर वीज पडून एक शेतकरी महिला मृत्युमुखी पडल्याची घटना
मोहाडी तालुक्यातील काटेबाम्हणी पेट्रोल पंप समोर शनिवार दि. २ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.दुर्गा चवतमल राऊत (४२) रा. काटेबाम्हणी ता. मोहाडी असे मृत महिलेचे नाव आहे.
शेतातून घराकडे जात असतांना अचानक तुमसर-रामटेक राष्ट्रीय महामार्गावरील काटेबाम्हणी पेट्रोल पंप समोर वीज कोसळल्याने शेतकरी महिलेचा मृत्यू झाला. सतत दोन दिवसांत विजांनी घेतलेला तालुक्यातील हा दुसरा बळी आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी आज सलग दुसऱ्या दिवशी दुपारी वादळी पाऊस पडला. घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी परसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मोठी गर्दी केली. घटनेची माहिती तुमसर पोलिसांना मिळताच घटनास्थळी गाठून घटनेचा पंचनामा केला व प्रेत शवविच्छेदना करिता तुमसर सुभाष चंद्रभोस उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविले.
शासनाने मृतक परिवाराला आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

ग्रा पं कान्द्री येथे लोकार्पण सोहळा थाटात संपन्न

Sat Jul 2 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी   तीन कचरा गाडी, एक ट्रॅक्टर, एक पाणी टँकर व स्वर्गरथाचे लोकार्पण. कन्हान : – १४ व्या वित्त आयोग निधी अंतर्गत ग्रा पं कान्द्री व्दारे ग्रामस्थाच्या सेवेकरिता तीन कचरा गाडी, एक ट्रॅक्टर, एक पाणी टँकर व स्वर्गरथ विकत आणुन या सर्व गाड्यांची विधिवत पुजा अर्चना करून मान्यव रांनी हिरवी झेंडी दाखवुन लोकार्पण सोहळा थाटात साजरा करण्यात आला. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!